
पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत लिहिले की…
मुंबई : शीव प्रतीक्षानगर येथील पोलिस वसाहतीत राहणाऱ्या विजय साळुंखे (वय 38) या पोलिस अंमलदाराने भिंतीच्या कडीला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी वडाळा टीटी पोलिस अधिक चौकशी करीत आहेत.
विजय साळुंखे हे शाहूनगर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. पोटदुखीचा त्रास असल्याने ते 30 मे पासून कर्तव्यावर गैरहजर होते. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास विजय साळुंखे यांनी राहत्या घरातील भिंतीला असलेल्या कडीला नायलॉनच्या रस्सीने गळाफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच वडाळा टीटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन साळुंखे यांच्या अंगावर असलेल्या कपडय़ांची तपासणी केली असता त्यांच्या हाफ चड्डीच्या खिशात मृत्युपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळून आली. पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे साळुंखे यांनी त्या चिठ्ठीत नमूद केले आहे.

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
दरम्यान, पोलिस विभागात गेले काही दिवसांपासून मानसिक तणावामुळे आत्महत्या झाल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे.
धक्कादायक! पोलिसकाकाला नाकाबंदीदरम्यान ट्रकने चिरडले…
पोलिसकाकाका विशाल पवार यांच्या मृत्यूबाबत वेगळेच गूढ…
पोलिसकाकाचा हर्सूल मध्यवर्ती कारागृहाच्यामागे ठेचून खून…
पोलिसकाकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू…
पुणे शहरातील पोलिसकाकाची गोळी झाडून आत्महत्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

