मुलीने सर्व प्रकार खिडकीतून पाहिला होता; जन्मठेपेची शिक्षा…

डेहराडून (उत्तराखंड): नववीत शिकणाऱ्या मुलीने आईचा गुन्हा पोलिसांसमोर उघड केला असून, मुलीच्या जबाबाच्या आधारे पिथौरागढ सेशन्स कोर्टाने आरोपी महिलेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच 50 हजार रुपये दंड किंवा अतिरिक्त पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षाही ठोठावली आहे.

14 फेब्रुवारी 2022 रोजी पूरण राम यांनी महसूल पोलिसात तक्रार दाखल केली होती. आपली वहिनी सुनीता देवी (वय ४०) हिच्यावर पती जितेंद्र रामचा जीव घेतल्याचा आरोप पूरण रामने केला होता. जितेंद्र आणि सुनीता पिथौरागढमधील दिगस गावात राहत होते. पूरण राम हा जवळच्या एका गावात राहत होता. 12 फेब्रुवारी रोजी रात्री भाऊ जितेंद्रच्या मृत्यूची बातमी पूरण रामला मिळाली होती. पूरण राम जेव्हा दिगस गावात पोहोचला तेव्हा त्याला जितेंद्रच्या कपड्यांवर आणि आजूबाजूला रक्ताचे डाग दिसले होते. हे पाहून पुरणला आपल्या भावाचा मृत्यू संशयास्पद वाटला होता.

जितेंद्रच्या 15 वर्षांच्या मुलीने या प्रकरणाचा संपूर्ण खुलासा केला. जितेंद्रच्या मुलीने पूरणला सांगितले की, तिचे वडील रात्री कामावरून घरी परतल्यावर आई आणि वडिलांमध्ये भांडण झाले. यावेळी आरोपी सुनीताने दरवाजा आतून बंद केला आणि जितेंद्रला बेदम मारहाण केली. रागाच्याभरात तिने पतीचे गुप्तांग ब्लेडने कापले. मुलीने खिडकीतून हा सगळा प्रकार पाहिला होता. आईला दरवाजा उघडण्याची विनंती करत होती. मात्र, आईने दरवाजा उघडला नाही. मुलीचं म्हणणं आहे की, जास्त रक्तस्राव झाल्याने तिच्या वडिलांचा मृत्यू झाला.

मुलीने पोलिसांना देखील सर्व प्रकार सांगितला. तिने कोर्टात आईविरुद्ध साक्ष देखील दिली. चौकशीदरम्यान सुनीतानेही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली व तिने पतीचे गुप्तांग कापल्याचे सांगितले. हत्येनंतर सुनीताने जवळच्या झाडीत ब्लेड फेकले होते. तपासादरम्यान पोलिसांनी ब्लेड जप्त केले. दरम्यान, पिथौरागढ सेशन्स कोर्टाने 23 जुलै 2024 रोजी या प्रकरणाचा निकाल दिला. कोर्टाने सुनीताला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय कोर्टाने सुनीताला 50 हजार रुपये दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. सुनीताने दंड न भरल्यास तिला आणखी पाच वर्षे तुरुंगवास भोगावा लागू शकतो.

मामी आणि भाच्याचे प्रेमसंबंध! नातेसंबंधांना लाजवेल अशी एक घटना…

प्रेम, लव्ह मॅरेज अन् प्रेमसंबंध! दादर सूटकेस प्रकरणात पत्नीला अटक…

प्रेमविवाहानंतर दाजीने केला एकुलत्या एका मेव्हण्याचा खून…

कोल्हापुरातील जवानाची अखेर मृत्यूशी झुंज संपली; पत्नी, प्रियकरावर गुन्हा दाखल…

Video: महिला पोलिस अधिकाऱ्यासोबत नवऱ्याला रंगेहात पकडले अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!