नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात; 4 वारकऱ्यांचा जागीच मृत्यू…
नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावर पालखीत कंटेनर घुसल्याने तीन वारकऱ्यांचा मृत्यू तर दहा जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शिर्डीहून आळंदीला जाणाऱ्या पालखीत कंटेनर घुसल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या अपघातग्रस्त कंटेनरचा चालक मद्यपान करून वाहन चालवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिर्डी येथील काशिकानंद महाराज यांची पायी दिंडी शिर्डीहून आळंदीकडे जात होती. या दिंडीत भरधाव वेगात येणारे MH 12 VT 1455 कंटेनर घुसल्याने भीषण अपघात झाला. या अपघाताततीन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला तर दहा ते बारा वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर परिसरातील नागरीकांनी तात्काळ मदत करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून संतप्त नागरिकांनी या कंटेनरची तोडफोड केली आहे. अपघातात वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू…
भीषण अपघात! दोन सख्ख्या भावांसह पाच मित्रांचा जागीच मृत्यू…
Video: पुणे-बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोघांचा मृत्यू तर…
मुंबईत वरळी सी लिंकवर 6 वाहनांचा विचित्र अपघात; तिघांचा मृत्यू…
भीषण अपघात! रिक्षावर ट्रक उलटून चार जणांचा जागीच मृत्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!