
पत्नीच्या मदतीने नवऱ्याने ठेवले जबरदस्तीने शारीरिक संबंध…
पुणे : पतीने पत्नीच्या मदतीनेच एका युवतीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कात्रज परिसरता घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
महिलेने ओळखीच्या युवतीला (वय १९) वडापाव खायला देण्याच्या बहाण्याने घरी बोलावले. त्यानंतर युवतीला घरात सोडून महिला बाहेर गेली. त्यावेळी तिने घराला बाहेरून कडी लावली. त्यानंतर महिलेच्या पतीने तरुणीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. ३ मार्च रोजी दुपारी दोन ते रात्री साडे अकराच्या सुमारास कात्रज परिसरात हा प्रकार घडला. पीडित युवतीने शुक्रवारी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून प्रल्हाद सखाराम साळुंके आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पीडित युवती भाजी मंडईतून चालत जात होती. तेव्हा तिच्या ओळखीची असलेली महिला तिला भेटली. महिलेने युवतीला तिच्या घरी नेले आणि वडापाव द्यायचा बहाणा करून एकटीलाच घरी ठेवले आणि बाहेर गेली. महिलेने जाताना बाहेरून घराला कडी लावली. महिला निघून जाताच तिच्या पतीने युवतीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जबरदस्तीने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. या अत्याचारानंतर पीडित युवतीने थेट पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पती पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलिस करत आहेत.
पुणे जिल्ह्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या…
पुणे शहरातील पोलिसकाकाची गोळी झाडून आत्महत्या…
पुणे शहरात भीषण अपघातात युवकाचा मृत्यू; धक्कादायक Video…
पुणे शहरात बीएएमएस झालेल्या युवतीची लाखो रुपयांची फसवणूक…
हाय प्रोफाईल चोर! पुणे शहरात विमानाने येऊन चोरी करणारी टोळी गजाआड…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

