कौतुकास्पद! कोल्हापूर परिक्षेत्रात सोलापूर ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी…
सोलापूर (प्रतिक भोसले): कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलिस कर्तव्य मेळावा – २०२३ हा पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालयात पार पडला. सोलापूर ग्रामीण संघाने या मेळाव्यात तीन सुवर्ण, तीन रौप्य व सहा कांस्य पदके पटकावून कोल्हापूर परिक्षेत्रात घवघवीत यश संपादित केले. सोलापूर ग्रामीण पोलिस संघाचे नेतृत्व पोलिस निरीक्षक तय्युब मुजावर यांनी केले.
बार्शी शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी फॉरेन्सीक सायन्स श्वान टेरी व हस्तक पोलिस हवालदार सिध्दलिंग स्वामी श्वान पथक यांनी एक्सप्लोसिव्ह सर्च व क्रांती पवार पोलिस मुख्यालय यांनी पोलिस ऑब्जर्वेशन स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण पदक पटकावले. पोलिस हवालदार जयवंत सादुल अंगुली मुद्राफ विभाग यांनी इपोलिस फोटोग्राफी श्वान डॉली व हस्तक पोलिस हवालदार चिंतामणी जंगले, श्वान इट्राकर व बॉन्ड यांचे हस्तक पोलिस हवालदार तौसिफ शेख श्वान पथक यांनी नार्को टीक्स या स्पर्धेत तीन रौप्य पदकांची कमाई केली.
पोलिस उपनिरीक्षक सुरज निंबाळकर यांनी फॉरेन्सीक सायन्स व ऑफिसर फोटोग्राफी पोलिस हवालदार इक्बाल शेख यांनी सीसीटीएनएसफ विभाग व व्हीबी नेट कॉम्प्युटर पोलिस हवालदार प्रसाद मांढरे (वळसंग) यांनी व्हीबी नेट व एमएस ऑफीस कॉम्प्युटर आणि पोलिस हवालदार योगेश नरले (सायबर) यांनी इएमएस ऑफीस कॉम्प्युटर या स्पर्धेत एकूण सहा कांस्य पदके पटकावून सोलापूर ग्रामीण पोलिसांची मान कोल्हापूर परिक्षेत्रात उंचावली आहे. पुण्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शाम चंडक यांच्या हस्ते आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, उपअधीक्षक विजया कुर्री, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, राखीव पोलिस निरीक्षक आनंद काजुळकर, श्वान पथकाचे पोलिस उपनिरीक्षक भारत मस्के आदींच्या उपस्थितीत सर्वांचा सन्मान करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्लस शोभराज आणि पोलिस अधिकारी मधुकर झेंडे: अशोक इंदलकर
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून…
पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…