अहमदनगर जिल्ह्यातील बोगस डॉक्‍टरवर गुन्हे दाखल करा…

नगर: अहमदनगर जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हा तसेच तालुका स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात विनानोंदणी तसेच अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर विनाविलंब कारवाई करत त्यांच्यामध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्याचे सक्त आदेश जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बोगस वैद्यकीय व्यावसायिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रंसगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी मनपाचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, अशासकीय सदस्य गणेश बोऱ्हाडे आदी अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यात अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांच्या शोधासाठी मोहिम राबविण्यात यावी. ज्यांच्याकडे वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्‍यक असणारी नोंदणी नाही. व्यवसायासाठी कुठलीही अर्हता नसलेल्या व जनतेची फसवणुक करणाऱ्या बोगस डॉक्‍टरवर गुन्हे दाखल करा. तसेच यापूर्वीच्या दोषी आढळलेल्या व न्यायालयांमध्ये सुरु असलेल्या प्रकरणांचाही सातत्याने पाठपुरावा करा.’

दिशा भोईटे हिचा वैद्यकीय खून समजावा का?

दिशा भोईटे हिच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन; चौकशीची मागणी…

हृदयद्रावक! चूक कोणाची? आई मला जगायचं गं…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!