आठ महिन्यांच्या गर्भवती पोलिस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू…

अमरावती : दुचाकीने पाठीमागून धडक दिल्याने महिला पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना अमरावती जिल्ह्यात घडली आहे. शनिवारी मध्यरात्री ड्युटी संपवून घरी परतत असताना हा अपघात झाला. प्रियंका शिरसाट असे मृत महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्या आठ महिन्यांच्या गर्भवती होत्या. या घटनेमुळे पोलिस विभागात शोककळा पसरली आहे.

गाडगे नगर पोलिसांनी आरोपी दुचाकी चालक गौरव मोहोड याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. प्रियंका शिरसाट या दहा वर्ष ग्रामीण पोलिसाच्या नियंत्रण कक्षात कार्यरत होत्या. शनिवारी रात्री दोनच्या सुमारास त्या ड्युटी संपवून पती सागर रमेश शिरसाट यांच्यासोबत दुचाकीवरुन घरी जाण्यासाठी निघाले होते. गाडगे नगर मंदिरापासून काही अंतरावर पाठीमागून वेगाने येणाऱ्या दुचाकीने पोलिस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात प्रियंका आणि तिचा पती खाली पडले. प्रियांकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर गर्भातील बाळ देखील मरण पावले आहे. याशिवाय पतीवर उपचार सुरु आहेत. आरोपी दुचाकी चालक गौरव मोहोड याला अटक करण्यात आली आहे.

पंढरपूरमध्ये पोलिस उपनिरीक्षकाचा हल्ल्यात मृत्यू…

महिला पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या…

पोलिसकाकाने कर्तव्यावर असताना स्वत:वरच झाडून घेतली गोळी…

पोलिसांच्या कुटुंबियांसाठी गृह विभागाने घेतला मोठा निर्णय…

पोलिसांच्या गाडीसह चार वाहनांना धडक; पोलिसकाका जखमी…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!