नोकरीला लावण्याचे आमीष दाखवत प्राध्यापकाची केली आर्थिक फसवणूक…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): सहा लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी बारामती येथील पती-पत्नीवर पारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्हा शिक्षक मंडळ च्या अण्णासाहेब वाघेरे महाविद्यालयात ओतुर (ता. जुन्नर) या ठिकाणी निघालेल्या प्राध्यापक भरतीत प्राध्यापकाची नोकरी लावून देतो असे म्हणत बापूसाहेब हरिभाऊ शिंदे या प्राध्यापकाची सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना मार्च २०२३ ते १६/८/२०२४ दरम्यान घडली आहे. याप्रकरणी रमेश ज्ञानदेव गावडे, जयश्री रमेश गावडे ( दोन्ही रा. भिगवन रोड बारामती) यांच्यावर पारगाव कारखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, फिर्यादी बापूसाहेब हरिभाऊ शिंदे (वय ३९) हे निरगुडसर ता. आंबेगाव येथील रहिवासी असून ते पारगाव कारखाना दत्तात्रय वळसे पाटील महाविद्यालयात सीएसबी प्राध्यापक म्हणून नोकरी करत आहेत. सन २०२३ मध्ये ओतुर (ता. जुन्नर) येथील पुणे जिल्हा शिक्षक मंडळ यांच्या अण्णासाहेब वागीरे महाविद्यालयात प्राध्यापक भरतीची जाहिरात निघाली होती. त्यावेळी बापूसाहेब शिंदे यांनी प्राणिशास्त्र या विषयाच्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज भरला होता. त्यानंतर शिंदे यांनी त्यांचे नातेवाईक संतोष दातीर यांना याबाबत सांगितले असता त्यांनी त्यांचे नातेवाईक रमेश ज्ञानदेव गावडे (रा. भिगवण रोड बारामती) यांचे राजकीय संबंध चांगले आहेत ते तुला प्राध्यापकाची नोकरी मिळवून देतील असे सांगितले. त्यानंतर बापूसाहेब शिंदे यांनी रमेश गावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तुला नोकरी मिळेल यासाठी ३० लाख रुपये द्यावे लागतील. त्यातील ५ लाख रुपये लगेच द्यावे लागतील असे सांगितले.

बापूसाहेब शिंदे यांनी रमेश गावडे याच्यावर विश्वास ठेवून पत्नी व कुटुंबियांकडून पैसे जमा करून पाच लाख रुपये ३१/५/२०२३ रोजी रमेश गावडे यांची पत्नी जयश्री रमेश गावडे यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर पाठवले. त्यानंतर रमेश गावडे यांनी संस्थेच्या क्लार्कला १ लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले असता शिंदे यांनी पुन्हा रमेश गावडे यांच्या पत्नी जयश्री गावडे यांच्या बँकेच्या खात्यावर दिनांक २३/६/२०२३ रोजी एक लाख रुपये पाठवून दिले. त्यानंतर दिनांक १७/८/२०२३ रोजी शिंदे यांचा ईमेल द्वारे मुलाखतीची पत्र मिळाले. मुलाखत झाल्यानंतर शिंदे यांनी रमेश गावडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली असता रमेश गावडे यांनी तुझी नियुक्ती होईल राहिलेले पैसे द्यायची तयारी करा असे सांगितले. त्यानंतर दि. १/१२/२०२३ रोजी बापुसाहेब शिंदे यांना समजले की त्यांनी अर्ज केलेल्या जागेवर दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती झाली आहे. त्यावेळी बापूसाहेब शिंदे यांनी रमेश ज्ञानदेव गावडे यांचेकडे पैशांची मागणी केली असता गावडे याने आठ दिवसात पैसे देतो असे सांगितले. त्यानंतर वारंवार पैसे मागूनहीं त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने तो आपली फसवणूक करत असल्याचे बापूसाहेब शिंदे यांच्या लक्षात आले. याबाबत शिंदे यांनी पारगाव कारखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी रमेश ज्ञानदेव गावडे जयश्री रमेश गावडे या दोघांवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पारगाव कारखाना पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे करत आहेत.

महाराष्ट्राच्या जवानाला वीरमरण; वाहन कोसळले ८०० फूट खोल दरीत…

खोक्याचे घर जाळलं; प्राण्यांचा मृत्यू तर कुटुंबीयांना मारहाण झाल्याचा आरोप…

खोक्याचे घर जाळलं; प्राण्यांचा मृत्यू तर कुटुंबीयांना मारहाण झाल्याचा आरोप…

प्रेमसंबंध! नाशिकमध्ये महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी; चिठ्ठीतील नावे पाहा…

सोलापूरमध्ये युवकाची अत्यंत क्रूरपणे हत्या; गरम सळईने दिले चटके…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!