
पुणे शहरातील सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून पिस्टल जप्त…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून ०१ पिस्टल ०२ राऊंड असा ४८,८००/- रु.कि.चा मुददेमाल जप्त करण्यात गुन्हे शाखा युनिट -२च्या पथकाला यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
प्रताप मानकर: खेळ आणि वैचारीक खुराकाची सांगड घालणारा अधिकारी!
पुणे शहरात सराईत गुन्हेगारावर कायदेशीर कारवाई तसेच अग्निशस्त्रे बाळगणा-यांना वेळोवेळी त्यास चेक करुन कायदेशीर कारवाई करणेचे आदेशीत करण्यात आले होते. त्याअनुषगाने पोलिस उप आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट ०२ कडील अधिकारी व अमंलदार हददीत गस्त करीत असताना दि. ११/०१/२०२५ रोजी पोलिस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव यांना गुप्त बातमीरामार्फत माहिती मिळाली की, मस्तान हॉटेल जवळ कात्रज रोडवर एक व्यक्ती पिस्टल/अग्नीशस्त्र घेवून येणार आहे. सदर बातमी युनिटचे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांना दिली असता त्यांनी युनिट कडील अधिकारी व अमंलदार यांना सापळा व छापा कारवाई करणेकामी आदेशीत केले. त्याप्रमाणे युनिट कडील अधिकारी व अमंलदार यांनी मिळालेल्या गोपनिय बातमीप्रमाणे गुन्हेगार सोहम शशिकांत वाघमारे (वय २०, रा तळजाई वसाहत सहकारनगर पुणे) यास ताब्यात घेवून त्याचेकडून ०१ लोखंडी पिस्टल मॅगझीनसह व ०२ जिवंत काडतुसे असा ४८,८०० /- रु कि चा माल जप्त केला आहे. त्याने सदर अग्निशस्त्र व काडतुसे हे अनाधिकाराने बेकायदेशीर रित्या विनापरवाना जवळ बाळगून विक्रीकरीता घेवून आल्याबाबत कबुली दिली आहे. त्याचेवर भारती विदयापीठ पोलिस स्टेशन पुणे येथे गुन्हा रजि क्रमांक ३१/२०२५ आर्म अॅक्ट कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास चालू आहे.
सदरची कामगिरी अपर पोलिस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलिस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा. पो. आयुक्त गुन्हे, १ गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट २ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, प्रताप मानकर, सपोनि आशिष कवठेकर, अमोल रसाळ, पो.उप.निरी नितीन कांबळे, पोलिस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, शंकर नेवसे, अमोल सरडे, गणेश थोरात, ओमकार कुंभार, हनुमत कांबळे, विनोद चव्हाण, प्रमोद कोकणे, विजयकुमार पवार, राहुल शिंदे, साधना ताम्हाणे, निखिल जाधव, पुष्पेंद्र चव्हाण, नागनाथ राख यांनी केली आहे.
स्वारगेट पोलिसांनी रेकार्ड वरील गुन्हेगारास पिस्टल मॅग्जीनसह केली अटक…
पुणे शहरात पिस्टल जवळ बाळगणाऱ्यास सहकारनगर पोलिसांनी घेतले ताब्यात…
पुणे! आंबेगाव स्टेशनच्या पोलिसांनी पिस्टल बाळगणाऱ्यास केली अटक…
पुणे शहरात रेकार्डवरील सराईत गुन्हेगारास पिस्टल व काडतुसह युनिट २ कडून जेरंबद…
पुणे शहरात सराईत गुन्हेगाराकडून एक पिस्टल व दोन राऊंड जप्त…

