पुणे! बुधवार पेठेत जाणाऱ्यांचा घरापर्यंत पाठलाग करायचे अन्…

पुणेः बुधवार पेठेत जाणाऱ्या लोकांचा घरापर्यंत पाठलाग करत ऑनलाईन पैसे टाकतो कॅश द्या असे म्हणत पैसे उकळल्याचा प्रकार घडला आहे. पैसे घेऊन ऑनलाईन न टाकता उलट तुम्ही बुधवार पेठेतून फिरत आहात असे सांगत तुमची बदनामी करू, असे धमकावत त्यांच्याकडून पैसे लुटल्याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!

बुधवार पेठेत जाणाऱ्यांचा पाठलाग करत नंतर त्यांच्या घरापर्यंत जात पैसे उकळत असल्याचा प्रकार नांदेड सिटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून समोर आला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आयुष राजू चौगुले, सदफ पठाण असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील आरोपी असणारे दोघे जण हे फिर्यादी बुधवार पेठेत गेले असता त्याचा पाठलाग करत त्याच्या घरापर्यंत आले आणि तुम्ही आमच्याकडून 20 हजार रुपये ऑनलाइन देतो अशी बतावणी करत पैसे द्या अन्यथा आम्ही तुमची बदनामी करू अशी धमकी दिली. आम्हाला पैसे द्या अन्यथा बुधवार पेठेत गेलात अशी तुमची बदनामी करू अस फिर्यादीला धमकावले.

आरोपींनी पोलिस हेल्पलाइनवर कॉल करत आमच्याकडून 20 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याची पोलिसात तक्रार द्यायला सुरुवात केली. त्यानंतर नांदेडला पोलिस घटनास्थळी दाखल होऊन या सगळ्या प्रकरणाची शहानिशा केली. त्यानंतर पोलिसांच्या लक्षात आले की हे दोन आरोपी फिर्यादीची फसवणूक करत आहेत. त्यानंतर या दोन्ही आरोपींना नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे! तळजाई टेकडीवर ‘भावी’ पोलिसांना बेदम मारहाण…

पुणे! प्रेमीयुगुलाची विष प्राशन करून खडकवासला धरणाजवळ आत्महत्या…

पुणे! पत्नी आणि तिच्या मित्राच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

पुणे! मैत्रिणीला दिवस गेल्याचे कळल्यानंतर रबडीतून दिली गोळी अन् अनेकींसोबत संबंध…

पुणे कोंढवा प्रकरणात नवा ट्वीस्ट, प्राध्यापिकेची एन्ट्री…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!