पुणे पोलिस दलात एकच खळबळ! 32 कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…

पुणे: पुणे शहर पोलिस दलातील लोणी काळभोर पोलिस स्टेशनमधील तब्बल 32 पोलिस कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. पुणे पोलिस दलात या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे आदेश काढले आहेत. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांची उचलबांगडी झाल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या कारवाईमध्ये प्रामुख्याने पोलिस स्टेशनमधील विविध स्तरावरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलिस आयुक्तांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 मधील कलम 22 (एन) अन्वये हे विशेष अधिकार वापरून आदेश दिले आहेत.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

बदल्यांमध्ये 3 सहाय्यक फौजदार, 10 पोलिस हवालदार आणि 19 पोलिस अंमलदार अशा एकूण 32 जणांचा समावेश आहे. लोणी काळभोर परिसरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्या असल्याचे स्पष्टीकरण पुणे पोलिसांनी दिले आहे.

मात्र, पोलिस दलातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, एकाच स्टेशनमधील एवढ्या मोठ्या फौजेची बदली होण्यामागे केवळ प्रशासकीय कारण नसून काही गंभीर बाबी असण्याची शक्यता आहे. या बदल्यांमुळे लोणी काळभोर पोलिस स्टेशनचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला जाणार आहे. कामात शिस्त आणण्यासाठी आयुक्त अमितेश कुमार यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, पोलिस आयुक्तांच्या या आदेशानुसार, बदली झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्वरित नवीन ठिकाणी रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एकाच वेळी 32 जणांना हटवल्यामुळे रिक्त झालेल्या जागी आता नवीन अनुभवी टीम तैनात केली जाणार आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि पोलिस प्रशासनाची प्रतिमा सुधारण्यासाठी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

पुणे! पोलिस आयुक्त कारवाईचा आढावा घेण्यासाठी स्वतः उतरले रस्त्यावर…

पुणे पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आंध्र प्रदेशातून निलंबित पोलिसाला केली अटक…

Video: पुणे पोलिस दलातील ‘मार्शल’ ठरले देवदूत; सीपीआर देऊन वाचवले प्राण…

पुणे पोलिस आयुक्तांचे PRO सहाय्यक पोलिस अधिकाऱ्याचं निलंबन…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!