
Video: कारखान्यात भीषण आग, 11 मजुरांचा होरपळून मृत्यू…
नवी दिल्ली : उत्तर दिल्लीतील अलीपूर भागातील दयाल मार्केटमधील एका पेंट फॅक्टरीत आग लागून 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यासोबतच चार जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेतील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिल्लीतल्या अलीपूरमध्ये ही घटना घडली आहे. मृतांची ओळख अद्याप पटली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मार्केटमध्ये गुरुवारी (ता. १५) सायंकाळी उशिरा भीषण आग लागली. आग लागल्याने कामगार कारखान्यात अडकले. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मजुरांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या दुर्घटनेत ११ मजुरांचा होरपळून मृत्यू झाला. मृत कामगारांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. आग लागलेली इमारत एक मजली असून तिथे पेंट निर्मिती केली जात होती. गेल्या काही दिवसांत दिल्लीमध्ये सतत आगीच्या घटना समोर येत आहेत, ही चिंतेची बाब असल्याचंही म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका घरात केमिकलचे ड्रम टाकून रंग तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. आग इतकी भीषण होती की, आजूबाजूची चार घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास ही आग लागली आणि रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर, शुक्रवारी सकाळी आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले आहे.
#WATCH | Delhi: A fire broke out at the main market of Alipur. Fire tenders at the spot, efforts to douse the fire underway. pic.twitter.com/M5dvY3Q6er
— ANI (@ANI) February 15, 2024

