
संतापजनक! सामूहिक बलात्कारातील पीडित मुलीवर पुन्हा बलात्कार अन्…
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील द्वारका नॉर्थ भागात 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बंदुकीच्या धाकाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मुलीने विरोध केल्यानंतर आरोपीने पीडितेला पाचव्या मजल्यावरून खाली फेकले. पीडितेच्या कुटुंबीयांनी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
पीडितेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी बलात्कार, खुनाचा प्रयत्न अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पीडितेवर या पूर्वीही सामूहिक बलात्कार झाला होता. या प्रकरणातील आरोपी कारागृहातून बाहेर आल्यानंतर मुलीवर साक्ष बदलण्यासाठी दबाव आणत होते. पीडितेच्या कुटुंबीयांनी त्याच आरोपीवर संशय व्यक्त केला आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला आहे.
पीडित मुलगी आपल्या कुटुंबासह द्वारका परिसरात राहते. सोमवारी तिचे वडील काही कामानिमित्त दिल्लीबाहेर गेले होते. तिची आई देखील मुलीच्या भावंडांना घेऊन बाहेर गेली होती. यादरम्यान आरोपी आला आणि मुलीला पिस्तुलाचा धाक दाखवून जवळच्या इमारतीत घेऊन गेला. तिथे आरोपीने पाचव्या मजल्यावरील टेरेसवर तिच्यावर बलात्कार केला. मुलीने विरोध केला असता तिला टेरेसवरून खाली फेकून दिले. रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांनी मुलीला रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती गंभीर आहे.
घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी पीडितेने पोलिसांकडे केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसकाका Video News: २५ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…
संतापजनक! बापलेकीच्या नात्याला काळिमा; अल्पवयीन मुलगी गरोदर…
संतापजनक! मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी युवतीवर केला बलात्कार अन् पुढे…
संतापजनक! बापाने चिमुकलीला जमीनीवर जोरात आपटून मारले…
संतापजनक! पत्नीने कापला पतीचा प्रायव्हेट पार्ट…
संतापजनक! वडिलांच्या मृतदेहाशेजारीच मुलीने प्रियकरासोबत ठेवले शारीरिक संबंध…

