घरात झोपी गेलेली श्रेया अचानक ओरडून जागी झाली अन्…
सांगली : एका मुलीचा झोपेत असताना सर्पदंशाने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. श्रेया श्रीशैल न्हावी (वय 15, रा. संख, ता. जत, जि. सांगली) असे मृत मुलीचे नाव आहे. तिच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
श्रेया हिला शनिवारी रात्री झोपेत असताना सर्पदंश झाला होता. यानंतर श्रेया ओरडून जागी झाली. नातेवाइकांनी रात्री दहा वाजता जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी श्रेयाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
श्रेया ही आर. बी. पी. हायस्कूलमध्ये इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होती. श्रेया हिने शनिवारी रात्री कुटुंबियांसोबत जेवण केल्यानंतर नेहमीप्रमाणे झोपी गेली. यावेळी गावातील वीज गेली होती. आठच्या सुमारास तिला सर्पदंश झाल्यानंतर ती जागी होऊन ओरडू लागली. त्यानंतर कुटुंबीयांना खासगी रुग्णालयात तत्काळ नेले. तेथून तिला रात्री दहाच्या सुमारास जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
श्रेयाच्या निधनाचे वृत्त समजताच नातेवाइकांनी हंबरडा फोडला. रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद जत पोलिस ठाण्यात झाली आहे.
सापावर पाय पडल्याच्या भीतीनंतर चिमुकल्याचा घाबरुन मृत्यू…
हृदयद्रावक! पोत्यात साप समजून कोणी जवळ जात नव्हते, पण…
मुलीला साप चालवल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू…
कुडजे गावात मुलीला अंगणात खेळताना दिसला सात फुटी अजगर…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…