मुलीला साप चालवल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू…

पेण (रायगड): एका मुलीला साप चालवल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. सारा ठाकूर (वय १२) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. साराच्या मृत्यूनं गावावर शोककळा पसरली आहे. साराच्या मृत्यूला आरोग्य विभाग जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

पेण तालुक्यातील जिते गावात राहात असलेल्या सारा ठाकूर या चिमुकलीला मन्यार जातीच्या विषारी सापाने दंश केला. दंश झाल्यानंतर तिला उपचारासाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे उपचार न झाल्याने पेण येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तेथे देखील उपचार होऊ शकले नाहीत. त्यानंतर तिला अलिबाग जिल्हा रुग्णालयात व त्यानंतर कळंबोली येथील रुग्णालयात नेले. पण, योग्यवेळी उपचार न मिळाल्याने साराचा मत्यू झाला आहे.

दरम्यान, साराच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. ग्रामस्थांनी आरोग्य प्रशासनाला धारेवर धरले असून, साराच्या मृत्यूला आरोग्य विभागच जबाबदार असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या…

प्रियकराचा काटा काढण्यासाठी जंगलातून आणला नाग…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!