पुणे! रक्षाबंधनाला भाऊ रिकाम्या हाती आला तर जीवे मारु; स्नेहाने आयुष्य संपवलं…

पुणे: पुणे शहरातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणाच्या कटू आठवणी अजून विस्मृतीतही गेल्या नसताना पुन्हा एकदा असाच लज्जास्पद आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. रक्षाबंधनाला भाऊ रिकाम्या हाताने आला तर जीवे मारुन टाकू, अशी धमकी नवऱ्याने विवाहितेला दिली होती. यानंतर या विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!

स्नेहा विशाल झेंडगे (वय 27) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पुणे शहरातील आंबेगाव बुद्रुक येथे ती राहत होती. स्नेहाच्या वडिलांनी तिच्या सासरच्या मंडळींविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी स्नेहा झेंडगे हिचा नवरा विशाल, सासरे संजय झेंडगे, सासू विठाबाई झेंडगे आणि दीर विनायक झेंडगे, नणंद तेजश्री थिटे, नणंदेचा पती परमेश्वर थिटे आणि सासऱ्यांचे साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

स्नेहा हिने आंबेगाव पठार परिसरात राहत्या घरी आत्महत्या केली आहे. याबाबत माहिती देताना स्नेहाचे वडील कैलास सावंत म्हणाले की, ‘आम्ही झेंडगे कुटुंबीयांच्या मागणीप्रमाणे गेल्या वर्षी मुलीचे लग्न लावून दिले. लग्नानंतर काही महिने झेंडगे कुटुंबीय मोहोळला राहत होते, नंतर ते पुण्यात राहायला आले. आम्ही स्नेहाचा नवरा विशाल याच्या मागणीप्रमाणे शेतजमीन घेण्यासाठी त्यांना पाच लाख रुपये दिले. झेंडगे कुटुंबीय पुण्यात कुठे राहायला आले आहेत, हे त्यांनी आम्हाला सांगितले नव्हते. झेंडगे यांची वेळू येथे कंपनी आहे. स्नेहाचा भाऊ कंपनीत गेले असताना त्यांना हाकलून देण्यात आले होते.’

‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

स्नेहा झेंडगे आणि विशाल झेंडगे यांचे लग्नानंतर काही दिवस स्नेहाचे आयुष्य सुरळीत चालले होते. मात्र लवकरच सासरकडून त्रास सुरू झाला. सुरुवातीला स्नेहाला स्वयंपाक नीट येत नाही, असे सांगून त्रास दिला जायचा. नंतर पती व कुटुंबीयांनी कंपनी सुरू करण्यासाठी तब्बल 20 लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम आणून द्यावी म्हणून स्नेहावर वेळोवेळी दबाव आणला जाऊ लागला. पैसे मिळवण्यासाठी केवळ मानसिक छळच नव्हे तर मारहाण, शिवीगाळ अशा प्रकारची वागणूक दिली जात होती. या सगळ्याला कंटाळून स्नेहाने यापूर्वी पोलिसांत एक गुन्हा दाखल केला होता. मात्र, सासऱ्यांचे साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांनी तिला दम देऊन तो गुन्हा मागे घेण्यासाठी भाग पाडले. त्यामुळे स्नेहाचे मानसिक तणाव अधिकच वाढले. सातत्याने होणारा छळ, आर्थिक मागणी आणि कौटुंबिक हिंसाचार यामुळे ती पूर्णपणे खचली. अखेर 9 ऑगस्ट 2025 रोजी घरात कोणी नसताना स्नेहाने गळफास घेऊन जीवन संपवले आहे. यामुळे नातेवाईकांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

पुणे! IT इंजिनिअरची सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या; प्रेमप्रकरण की तणाव…

पुणे! पत्नीचा कंपनीत छळ; हतबल नवऱ्याची गळफास घेत आत्महत्या…

पुणे! पत्नी आणि तिच्या मित्राच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी वडीलांचा धक्कादायक खुलासा…

पुणे! नवऱ्याच्या अनैतिक संबंध अन् त्याच्या मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!