जवान पांडुरंग तावरे यांना 12 वर्षीय मुलाने दिला मुखाग्नी…
बीड : सिक्कीममधील ढगफुटीत बेपत्ता झालेले जवान पांडुरंग तावरे हुतात्मा झाले आहेत. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी काकड हिरा (जि. बीड) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पांडुरंग तावरे यांच्या मेघराज नव्याच्या 12 वर्षीय मुलाने त्यांना मुखाग्नी दिला.
सिक्कीममधील गंगटोक परिसरात मंगळवारी (ता. 3) ढगफुटी झाल्यानंतर तिस्ता नदीला पूर आला होता. यामध्ये भारतीय सैन्यातील 23 जवानांची तुकडी पुरात वाहून बेपत्ता झाली होती. तेव्हापासून एनडीआरएफच्या पथकाकडून शोधमोहीम सुरू होती. अखेर शनिवारी रात्री जवान तावरे यांचा मृतदेह सापडला. त्यानंतर आज (सोमवार) रोजी पांडुरंग तावरे यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी काकड हिरा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी भारतीय सैन्य दलातील अधिकारी पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी तसेच महसूल प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. हवेत बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्मा जवान पांडुरंग तावरे यांना मानवंदना देण्यात आली.
हुतात्मा जवान पांडुरंग तावरे यांचे मूळ गाव पाटोदा तालुक्यातील काकड हिरा हे आहे. ते 2009 मध्ये भारतीय सैन्यात भरती झाले. मागील 14 वर्षांपासून ते 18 महार बटालियनमध्ये नायक या पदावर कार्यरत होते. त्यांनी दिल्ली, राजस्थान, आसाम, बिकानेर, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश अशा विविध ठिकाणी देशसेवा केली. दोन महिन्यांपूर्वीच सिक्कीममधील गंगाटोक येथे कर्तव्यासाठी ते गेले होते.
सिक्किममध्ये ढगफुटी! लष्कराचे 23 जवान बेपत्ता…
हृदयद्रावक! जवान वैभव भोईटे यांना दीड वर्षांच्या लेकीने दिला अग्नी…
कौतुकाचा वर्षाव! जवानाचा Video पाहून पाणावतील डोळे…
जम्मू-काश्मीरमध्ये नदी ओलांडताना दोन जवान गेले वाहून…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…