पुणे शहरात एमपीडीए कायद्यान्वये ४५वी स्थानबध्दतेची कारवाई!

पुणे: बिबवेवाडी पोलिस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या अट्टल गुन्हेगारावर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एम. पी. डी. ए. कायद्यान्वये ४५ वी स्थानबध्दतेची कारवाई केली आहे.

पुणे पोलिस आयुक्तालयातील बिबबेवाडी पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार सनी संतोष भरगुडे (वय २४ वर्षे, रा. प्लॉट नं. १०, निलेश कॉम्प्लेक्स योगायोग सोसायटी, बिबवेवाडी, पुणे) हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह बिबेववाडी व भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत लोखंडी चाकू, लोखंडी कोयता यासारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह सरकारी नोकरास इच्छापूर्वक जबर दुखापत करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, विनयभंग (पोक्सो), दरोड्याचा प्रयत्न, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ०५ वर्षामध्ये त्याचे विरूध्द ०७ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.

प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी अट्टल गुन्हेगार सनी संतोष भरगुडे याच्या विरुध्द एम. पी. डी. ए. कायद्यान्वये अमरावती मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे ०१ वर्षा करीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. त्यास स्थानबध्द करण्यामध्ये बिबवेवाडी पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सविता ढमढेरे व ए. टी. खोबरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी कामगिरी पार पाडली.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दहशत निर्माण करणा-या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. पोलिस आयुक्त यांनी कार्यभार स्विकारल्यानंतरची एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची ही ४५ वी कारवाई असून, यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

पुणे पोलिस आयुक्तांची दोघांविरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाई…

पुणे शहरातील चिक्यासह त्याच्या दोन साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई…

‘तुला आम्ही खल्लासच करतो’ म्हणणाऱ्या आरोपींवर मोक्का कायद्यान्वये कारवाई…

पुणे पोलिस आयुक्तांनी केली सात जणांवर निलंबणाची कारवाई…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!