
सोलापूरमध्ये युवकाची अत्यंत क्रूरपणे हत्या; गरम सळईने दिले चटके…
सोलापूर : पिलीव-माळशिरस रस्त्यावरील फॉरेस्टचे निर्मनुष्य जंगलात एका युवकाचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. युवकाला हाल हाल करून मारण्यात आले असून, नग्न मृतदेहावर क्रूर मारहाणीचे आणि गरम सळईने चटके दिल्याचे निशाण दिसून आले आहे. अशा क्रूर पद्धतीने एका युवकाचा मृतदेह सापडल्याने सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
आकाश अंकुश खुर्द असे मृत युवकाचे नाव आहे. आकाश हा पिलीव येथे आपली विधवा आई, पत्नी आणि सात महिन्याच्या मुलासह राहत होता. मंगळवारी फोन आला आणि तो घराबाहेर पडला. मात्र, पहाटे त्याची क्रूर हत्या करून त्याचा मृतदेह या फॉरेस्टमध्ये टाकण्यात आला होता. मृतदेहाशेजारीच त्याची दुचाकी खाली पडलेल्या अवस्थेत होती. मात्र, मोबाईल गायब झाला होता. सकाळी ग्रामस्थांना ही घटना समजल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
आकाशचा मृतदेह इतक्या भयानक अवस्थेत सापडल्याने कुटुंबीय देखील हादरुन गेले होते. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेत मृत आकाशचा मोबाईल हा महत्त्वाचा पुरावा ठरणार असून यावर आलेले फोन कोणाचे होते, यावरून त्याच्या हत्येचा छडा लागू शकणार आहे. पण, त्याचा मोबाइलही गायब आहे. आकाशच्या हत्येमुळे केवळ 7 महिन्याचा मुलगा, विधवा पत्नी आणि विधवा आई आता उघड्यावर पडले आहेत. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
दरम्यान, बीड, लातूर, परभणीतील हत्याकांडाच्या घटना ताज्या असतानाच आता सोलापूर जिल्ह्यातही अशा क्रूर रीतीने मारहाण आणि चटके देऊन हत्या झाल्याने सोलापूर जिल्हा देखील हादरून गेला आहे.
धक्कादायक Video: लातूरमध्ये युवकाला नग्न करून बेदम मारहाण…
संतापजनक! सरपंच संतोष देशमुख यांना दिल्या नरकयातना; पाठ फोडली, कातडी सोलली…
खोक्या सापडला! प्रयागराजमधून सतीश भोसले याला पोलिसांनी केली अटक…
गज्या मारणे टोळीकडून मंत्री मोहोळ यांच्या कर्मचार्याला बेदम मारहाण…
आमदाराच्या पीएला रस्त्यावर खेचत केली बेदम मारहाण; कारण…
धक्कादायक! मुलीच्या नातेवाईकांनी केली वृद्ध वडिलांना बेदम मारहाण; जीव गेला…
Video: आंदोलन थांबवायला गेलेल्या पोलिस अधिकाऱ्याला बेदम मारहाण…
Video: व्यापाऱ्याला बेदम मारहाण अन् नग्न करून काढली धिंड…

