गणपती विसर्जनादरम्यान चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू…

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे गणपती विसर्जनादरम्यान चार वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अर्णव आशिष पाटील या चार वर्षीय मुलाचे नाव आहे.

मोशी येथील मंत्रा सोसायटी या ठिकाणी गुरुवारी (ता. २८) सायंकाळी ही घटना घडली आहे. अर्णव हा सोसायटीमधील गणपती विसर्जन टाकीच्या शेजारी उभा राहून पाहात होता. लेझीमच्या ठेक्यावर सोसायटीतील सदस्य नाचत असताना अचानक अर्णव हा टाकीत पडला हे कोणाच्याच लक्षात आले नाही. यासंबंधीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. अर्णव सोबतचा सेल्फी देखील पुढे आला असून तो शेवटचा ठरला आहे. पाटील यांचं कुटुंब देखील बाप्पाला निरोप देत होते. त्यावेळी अर्णव सुद्धा नाचत होता आणि टाकीत पडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, हिंजवडी येथील योगेश अभिमन्यू साखरे (वय 23) या युवकाचा गणपती विसर्जन मिरवणुकीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. राज्यात जल्लोषात गणेशोत्सव 10 दिवस पार पडला. डीजेच्या आवाजामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

दोन युवकांच्या मृत्यूला डीजेचा दणदणाट ठरला कारणीभूत…

Video : गणपतीच्या मंडपात नाचताना युवकाचा मृत्यू झाला कॅमेरात कैद…

गणपती बाप्पांना घरात आणताना पाय घसरल्याने युवकाचा मृत्यू…

Video: गणपती वर्गणीच्या नावाखाली किरणा दुकानदाराच्या लावली कानाखाली…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!