नाशिक पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्टल व काडतुसांसह एकाला केली अटक…

नाशिक (संदिप कद्रे): नाशिक शहर पोलिसांच्या विशेष पथक, गुन्हेशाखेने उत्कृष्ठ कामगिरी करताना देशी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) व ०३ काडतुसांसह एकाला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांचे आदेशान्वये नाशिक शहरात अवैध धंदे करणारे, अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे तसेच अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांचा शोध घेवून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी (ता. २२) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पोअ. २३८९ भगवान जाधव, पोना . ९११ दत्ता चकोर यांना बातमी मिळाली की, योगेश प्रल्हाद आहेर याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल असून, तो आशिर्वाद बिल्डींगचे जवळ येणार आहे. बातमीची खात्री करून कार्यवाही करणे कामी पोउनि. मुक्तेश्वर लाड, पोउनि. दिलीप सगळे, पोना. ९११ चकोर, पोना. ४९७ सोनवणे, पोअं. २५०९ निकम, पोअं २३८९ जाधव असे रवाना होवून पळसे, नाशिकरोड येथील आशिर्वाद बिल्डींगचे आजुबाजूस नमुद अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून थांबले होते. पोलिसांच्या पथकाने चारही बाजूने आरोपीस घेरून ताब्यात घेतले.

योगेश प्रल्हाद आहेर (वय ३९, रा. मगर मळा, रेल्वे ट्रॅक्क्षन गेट जवळ, एकलहरा रोड, नाशिक रोड, नाशिक) असे आरोपीने नाव सांगितले. त्याची अंगझडती घेता अंगझडतीत ४३,००० /- रू किंमतीचे देशी बनावटीचे पिस्टल ०३ जिवंत काडतुसे मिळून आली आहेत. त्यास ताब्यात घेवून पुढील कार्यवाही कामी नाशिक रोड पोलिस ठाणे येथे घेवून येवून सरकारतर्फे पोअ. २३८९ भगवान एकनाथ जाधव, नेम विशेष पथक, नाशिक शहर यांनी शस्त्र अधिनियम कलम ३/२५, सह मपोका १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उप आयुक्त (गुन्हे) श्री प्रशांत बच्छाव, सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे) डॉ. सिताराम कोल्हे यांची सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे वपोनि. जयराम पायगुडे, सपोनि / हेमंत नागरे, पोउपनि / लाड, श्रेणी पोउनि / दिलीप सगळे, सपोउपनि / रंजन बेंडाळे, पोहवा / १०६ किशोर रोकडे, पोहवा / १४९७ गणेश भामरे, पोहवा / १७४९ डंबाळे, पोना/५६१ योगेश चव्हाण पोना / ४९७ भुषण सोनवणे, पोना / १५३३ रविंद्र दिघे, पोना / ९११ दत्ता चकोर, पोअं/८६९ अनिरूध्द येवले, पोअं/ २४३२ बाळा नांद्रे, पोअं / २४३३ चंद्रकांत बागडे, पोअं / २५०९ चारूदत्त निकम, पोअं/ १४३० राऊत, पोअं / २२१८ विठ्ठल चव्हाण, सर्व नेम. विशेष पथक, गुन्हे शाखा, नाशिक शहर या पथकाने कामगिरी केलेली आहे.

नाशिकमध्ये चॉपरसारखे शस्त्र बाळगणारे अल्पवयीन मुले ताब्यात…

नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा दुचाकीस्वारांना दणका…

अपहरण! नाशिक गुन्हेशाखा युनिट क्र. १ची धडाकेबाज कामगिरी…

नाशिकमध्ये गुन्हे शाखा युनिट – १ची धडाकेबाज कारवाई…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!