
पुणे हादरले! गरोदर प्रेयसीवर चाकूने सपासप वार अन् पुढे…
पुणे: गरोदर प्रेयसीवर (वय २५) वार करत प्रियकराने तिला गंभीर जखमी केले पण सुदैवाने गरोदर युवती जीव वाचवून पळण्यात यशस्वी झाली. मात्र, तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला आहे.
विनायक सूर्यवंशी नावाचा युवक आणि पीडित युवती एकत्र कामाला होते. दोघांची ओळख झाल्यानंतर पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पुढे कामानिमित्त ही युवती मुंबईला गेली. विनायक 13 एप्रिल रोजी तिला घेऊन पुण्याला निघाला. रविवारी पहाटे लोणावळ्यात त्याने प्रेयसीवर चाकूने वार केले. प्रेयसी गरोदर होती. तिच्यावर वार केल्यानंतर तो जखमी अवस्थेतच तिला दिवसभर गाडीत फिरवत राहिला.
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पौडजवळील सिंबायोसिस कॉलेजजवळ रविवारी रात्री त्याने गाडी उभा केली. संधी मिळताच युवतीने गाडीतून उतरून पळ काढला. पुढे प्रियकरही तिथून फरार झाला. जखमी युवतीला पौडचे पोलीस हवालदार संतोष दावलकर आणि दीपक पालके यांनी ससून रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणात युवतीचा जीव वाचला. मात्र, पोटातील बाळाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी थेरगाव येथील संशयित आरोपी विनायक सूर्यवंशी याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.
पुणे जिल्ह्यात लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची आत्महत्या; कारण सांगितले…
पुणे शहरात युवतीने मित्रासोबत मिळून केला आईचा खून; कारण समोर…
पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचे अपहरण करून खून…
पुणे शहरात बीएएमएस झालेल्या युवतीची लाखो रुपयांची फसवणूक…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

