भारती विद्यापीठ पोलिसांनी महागडा लॅपटॉप चोरी करणाऱ्यास केली अटक…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात अॅपल कंपनीचा महागडा लॅपटॉप चोरी करणाऱ्या आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हद्दीत चोरींच्या गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे वरीष्ठांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना चोरीच्या गुन्हयांतील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध व्हावा म्हणुन पोलिस स्टेशन हदीत पेट्रोलींग करीत असताना पोलिस अंमलदार निलेश खैरमोडे व विठ्ठल चिपाडे यांना त्यांचे वातमीदारामार्फेतीने वातमी मिळाली की, एक जण कात्रज तलाव येथे चोरीचा लॅपटॉप विक्री करीत आहे. लागलीच तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी कात्रज तलाव येथे जावुन पाहता तेथे मिळालेल्या बातमीप्रमाणे रोहीत शंकर साठे (वय २० वर्षे, रा. गुजरवाडी, खोपडेनगर, कात्रज, पुणे) हा अॅपल कंपनीच्या महागडया लॅपटॉपसह व दोन मोबाईल फोनसह मिळुन आला. त्याचेकडे तपास करता त्याचे ताब्यातील अॅपल कंपनीचा महागडा लॅपटॉप हा भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन गुन्हा रजि नंबर ८२४/२०२३, भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीकडुन ४, ५०,०००/- रुपयांचा एक अॅपल कंपनीचा लॅपटॉप व २५,००० रुपयांचे दोन मोबाईल फोन असा एकुण ४,७५,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेशकुमार पोलिस आयुक्त,रामनाथ पोकळे (अतिरीक्त कार्यभार सह आयुक्त, पुणे शहर), प्रविणकुमार पाटील, अपर पोलिस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, स्मार्तना पाटील पोलिस उप आयुक्त परिमंडळ २, नारायण शिरगावकर, सहाय्यक पोलिस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलिस स्टेशनकडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड तसेच पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ, पोलिस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलिस अंमलदार निलेश खैरमोडे, विठ्ठल चिपाडे, शैलेश साठे, सचिन सरपाले, चेतन गोरे, निलेश जमदाडे, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, मितेश चोरमोले, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.

kashmir

भारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी…

भारती विद्यापीठ पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणाऱ्यास केली अटक…

भारती विद्यापीठ पोलिसांनी सराईत वाहन चोरास शिताफीने केली अटक…

पुणे शहरात खुनी हल्ला करणाऱ्यांना पर्वती पोलिसांनी केले जेरबंद…

पुणे जिल्ह्यात थर्टी फर्स्टच्या पार्टीदरम्यान युवकाने गमावला जीव…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!