दीड दिवसांच्या गणपती विसर्जन करताना तिघांचा बुडून मृत्यू…

पालघर: दीड दिवसांच्या गणपती विसर्जन करताना तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. जगत नारायण मौर्य (वय 38), सुरज नंदलाल प्रजापती (वय 25), प्रकाश नारायण ठाकरे (वय 35) अशी तलावात बुडून मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

बुधवारी सायंकाळी दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यासाठी गेले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने कोनसई येथील नाल्यात दोघांचा तर गो-हे येथील तलावात बुडून एकाचा मृत्यू झाला आहे. जगत नारायण मौर्य (वय 38), सुरज नंदलाल प्रजापती (वय 25) अशी कोनसई येथील नाल्यात तर प्रकाश नारायण ठाकरे (वय 35) हा गो-हे येथील तलावात बुडून मृत्यूमुखी पडला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्याने दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे विसर्जन करताना काळजी घेण्याचे आव्हान पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Video: पाकिस्तानमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर!

गणपती बाप्पांना घरात आणताना पाय घसरल्याने युवकाचा मृत्यू…

वर्दीतला गणपती बाप्पा! शिव ठाकरे याने थीम ठेवली ‘पोलिस’…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कुटुंबावर काळाचा घाला…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!