
मार्केटयार्ड पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगाराला सापळा रचून केली अटक…
पुणे (संदिप कद्रे): मार्केटयार्ड पोलिस स्टेशन कडील रेकॉर्डवरील जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक करुन त्याच्याकडून ०६ मोबाईल व ०१ अॅक्टीव्हा असा एकूण ९५,१०० रुपयांचा माल जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
मार्केटयार्ड पोलिस ठाणे कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रकाश देवराम परिहार ऊर्फ पक्या (वय २५ वर्षे, रा. गल्ली नं. ०१, राम मंदीराजवळ, लोहीया नगर, पुणे) याने आंबेडकरनगर परीसरात एकास सुरा दाखवून मोबाईल व रोख रक्कम चोरी केली असून मार्केटयार्ड पोलिस स्टेशन गु.र.नं. ३४ / २०२४ भा.द.वि. कलम ३९४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
मार्केटयार्डमधील रिक्षा स्टॅन्ड येथे पेट्रोलींग करीत जात असताना पोअं ८२३५ गायकवाड यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, प्रकाश देवराम परिहार ऊर्फ पक्या, हा शारदा गजानन मंदिरा शेजारील पान टपरी शेजारी उभा असल्याची बातमी मिळाली. सदरची बातमी ही आम्हास सांगितली असता आम्ही सदरची बातमी ही वपोनि, मार्केटयार्ड पो.स्टे. पुणे यांना कळविली असता, त्यांनी सदर बातमीची खात्री करून कारवाई करणे बाबत तोंडी आदेश दिले. शारदा गजानन मंदिरा शेजारी आड बाजुस उभे राहुन पाहणी केली असता, बातमी प्रमाणे प्रकाश देवराम परिहार ऊर्फ पक्या हा पान टपरी समोर उभा असल्याचा दिसला. पोलिसांना पाहुन पळुन जात असताना त्यास आम्ही थोडयाच अंतराव पकडले. त्याच्याकडे दाखल गुन्हयाबाबत तपास करता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. दाखल गुन्हयातील आरोपीची पोलिस कस्टडी घेवून त्यास अधिक विश्वासात घेता आरोपी प्रकाश देवराम परिहार ऊर्फ पक्या, याने ८५,०००/-रुकि ०६ मोबाईल, १०,०००/- रुकिं, ०१ अॅक्टीव्हा मोपेड व १००/- रुकिंचा सुरा असा एकुण ९५,१०० रुपये किंमतीचा माल पंचासमक्ष जप्त करण्यात आलेला आहे.
सदर ऍक्टीव्हा मोपेड गाडी क्र. एमएच १२ जे. एच ५८९७ बाबत मार्केटयार्ड पोलिस स्टेशन येथील गुन्हयाचा अभिलेख तपासला असता वरील वर्णनाचे ऍक्टीव्हा चोरी बाबत मार्केटयार्ड पो.स्टे. गु.र.नं. २६७ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असून दोन गुन्हे उघड करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, प्रविण पवार, सह पोलिस आयुक्त, पुणे शहर मनोज पाटील, अप्पर पोलिस आयुक्त, पुणे शहर, आर. राजा, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर, गणेश इंगळे, सहा पोलिस आयुक्त वानवडी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांचे आदेशाने तपास पथकाचे सपोनि मदन कांबळे, सोबत पोहवा ३४५३ थोरात, पोना ७५५४ जाधव, पोअं ८२३५ गायकवाड, पोअं २३९२ यादव, पोअं १०४६४ झायटे यांनी केली आहे.
पुणे शहरातील नवले पुलाजवळ पुन्हा विचित्र अपघात…
पुणे पोलिसांची ड्रग्जविरोधात मोठी कारवाई, कोट्यावधींचे ड्रग्ज जप्त…
पुणे शहरातील हॉटेल आणि पबसाठी पोलिसांची नवी नियमावली…
Video: पुणे शहरात एम.डी. ड्रग्ज रॅकेटच्या आंतरराष्ट्रीय टोळीस अटक…
पुणे शहरातील गुन्हेगारी संपवण्यासाठी पुणे पोलिसांचा पुढचा प्लॅन तयार…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

