छऱ्याच्या बंदूकीने गोळी घालून विवाहित महिलेची केली हत्या…

भिवंडी : सासरच्यांनी छऱ्याच्या बंदूकीने गोळी घालून विवाहित महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

विवाहित महिलेची सासरच्या मंडळींनी छऱ्याच्या बंदूकीने गोळी घालून हत्या केली आहे. या प्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहापूर तालुक्यातील अजनुप ग्रामपंचायत हद्दीतील बोंडरपाडा येथे ही घटना घडली. यात रंजना शिवा भवर (वय २७) नावाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे.

सासरच्या मंडळींनी छऱ्याच्या बंदुकीने गोळ्या घालून हत्या केल्याची माहिती मिळताच मृत महिला रंजना भवर हिच्या माहेरच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर जखमी महिलेला खर्डी येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. महिलेचा मृतदेह मुंबई येथील जे.जे. रूग्णालयात पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, सासरच्या 6 जणांविरोधात शहापूर पोलिस ठाण्यात हत्यचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खर्डी आणि शहापूर पोलिस करत आहेत.

अहमदनगर जिल्हा हादरला! जावयाने पत्नी, मेहुणा, आजे सासूची केली हत्या…

जादूटोण्याच्या संशय! वृद्धाच्या अंगावर झोपेतच ॲसिड टाकून केली हत्या…

सैराटची पुनरावृत्ती! दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने केली हत्या…

ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची मध्यरात्री हत्या; नदीवर अंघोळ केली अन्…

पुणे हादरले! अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग अन् आत्महत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!