रश्मी शुक्ला यांची पोलिस महासंचालकपदी वर्णी पुन्हा लांबणीवर…

पुणे : महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक पदाचा कार्यभार मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपवण्यात आल्यामुळे रश्मी शुक्ला यांची पोलिस महासंचालक पदावरील वर्णी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे.

महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ हे आज (रविवार) सेवानिवृत्त झाले. रजनीश सेठ यांच्या निवृत्तीनंतर रश्मी शुक्ला यांच्याकडे ही जबाबदारी जाईल, असे सांगितले जात होते. पण, सध्या विवेक फणसाळकर यांच्याकडे राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा कार्यभार देण्यात आला आहे.

दरम्यान, रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांची चौकशी झाली होती. विधानसभा निवडणुकीच्या काळात नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत याबाबत माहिती दिली होती. दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याविरोधातील फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी बंद झाली. रश्मी शुक्ला यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती.

राज्याच्या पोलिस महासंचालक पदी रश्मी शुक्ला…

Video: पोलिसकाकाच्या पत्नीने व्यक्त केलेल्या भावना नक्कीच ऐकण्यासारख्या….

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!