कवठे येमाई परिसरात पडला सुखोई विमानाचा पार्ट अन्…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या कवठे येमाई परिसरात सुखोई विमानाचा पार्ट पडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही.

मंगळवारी (ता. १७) दुपारी १२ च्या सुमारास सरावादरम्यान विमानाचा ६०-७० फूट लांबीचा पाइप सदृश मेटल पार्ट कवठे गावाच्या हद्दीत गांजेवाडी या परिसरात पडला होता. फाकटे, गांजेवाडी परीसरात हा पार्ट शोधून काढण्यासाठी काल पासून शोध मोहीम सुरू केली होती. रात्र झाल्याने व परीसरात बिबट्या आढळल्याने ही शोध मोहीम थांबवण्यात आली होती.

आज (बुधवार) पहाटे सकाळी शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल पन्हाळकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले, पोलिस स्टाफ व एअरफोर्स टीम ची शोध मोहीम सुरू झाली. शोध मोहीम सुरू केली असता हा पार्ट कवठे गावाच्या हद्दीत गांजेवाडी सापडला आहे. या कामी पोलिस पाटील व कवठे, गांजेवाडी, फाकटे परीसरातील ग्रामस्थांनी शोध घेण्यास मदत केली आहे. हा पार्ट६०-७० फुट लांबीचा असून निर्जन ठिकाणी पडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. हा पार्ट पाहण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.

दिशा भोईटे हिचा वैद्यकीय खून समजावा का?

प्रेमसंबंधात अडथळा! पुणे शहरात वेबसिरिज पाहून केला खून अन् मृतदेह…

दीड कोटी जिंकलेल्या पीएसआय सोमनाथ झेंडे यांच्यावर कारवाई…

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पकडण्यात पोलिसांना यश; कसा अडकला पाहा…

मीरा बोरवणकर यांचे आरोप अजित पवार यांनी फेटाळले; घटनाक्रम…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!