
पुणे! स्वारगेट पोलिस स्टेशन हद्दीतील घरफोडीचा गुन्हा उघडकीस…
पुणे: पुणे शहरातील स्वारगेट पोलिस ठाणे हद्दीतील सुयोग टॉवर, गुलटेकडी येथील सहाव्या मजल्यावरील ऑफिसमध्ये झालेल्या चोरीचा गुन्हा (गु.र.नं. 244/2025 भा.दं.वि. कलम 305(अ), 331(3), 331(4)) गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने उघडकीस आणला आहे.
19 सप्टेंबर 2025 रोजी दाखल झालेल्या या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी बिबवेवाडी, कोंढवा, मार्केटयार्ड व स्वारगेट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच स्थानिक नागरिकांची चौकशी केली. यामधून आरोपींचा शोध लागला.
गुप्त माहितीच्या आधारे सहायक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ व त्यांचे सहकारी पोलिस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर नेवसे व संजय जाधव यांनी गंगाधाम चौकात कारवाई करून दोन आरोपींना ताब्यात घेतले. निखिल विजय पवार (वय 19, रा. बिबवेवाडी) व अनुराग विजय पवार (वय 21, रा. बिबवेवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या कडून ₹40,000 रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली ₹80,000 किमतीची प्लसर मोटारसायकल जप्त करण्यात आली. दरम्यान, या गुन्ह्यातील तिसरा आरोपी गौरव संजय पवार (वय 20, रा. गुलटेकडी, स्वारगेट) याला 3 ऑक्टोबर 2025 रोजी अटक करण्यात आली. त्याच्याकडून ₹8,500 रोख रक्कम व 50 ग्रॅम वजनाचे चांदीचे बिस्किट जप्त करण्यात आले आहे.
संबधित कामगिरी अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलिस उपआयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे व सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे-1) विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. कारवाईत सहा. पो.नि. रसाळ, सहा. पो.नि. कवठेकर, तसेच पोलिस अंमलदार जाधव, मोकाशी, नेवसे, पवार, टकले, चव्हाण, सरडे, आबनावे, जाधव, कुंभार, थोरात, भिलारे, शिंदे, तांबोळी, वगारेया व महिला पोलिस अंमलदार ताम्हाणे यांनी सहभाग नोंदवला.
गौतमी पाटील हिच्या अडचणीत वाढ; पुणे पोलिसांचं मोठं पाऊल…
पुणे ! स्वारगेट एस.टी. स्टँन्ड परिसरातील प्रवाशांचे दागीने चोरणारी महिला जेरबंद…
गँगस्टर निलेश घायवळ पळाला स्विझर्लँडला, पुणे पोलिसांनी आवळल्या नाड्या….
पुणे! बंडगार्डन पोलिस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी…
पुणे पोलिसांनी आरोपींची काढली धिंड; निलेश घायवळ लंडनला…

