जादूटोण्याच्या संशय! वृद्धाच्या अंगावर झोपेतच ॲसिड टाकून केली हत्या…

जालना : जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून दोघांनी या वृद्धाच्या अंगावर रात्री झोपेतच अॅसिड टाकले होते. गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एकाला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

श्रीरंग हरीबा शेजूळ (वय 85, म्हसरूळ, ता.जाफराबाद) असे मृत वृद्धाचे नाव आहे. जाफराबाद तालुक्यातील म्हसरूळ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका वृद्धाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

उत्तम श्रीरंग शेजूळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वडील श्रीरंग शेजूळ नेहमीप्रमाणे 1 सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास आपल्या घरासमोरील अंगणात झोपले होते. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांना आपल्या वडिलांच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी आपल्या चुलतभावाला सोबत घेऊन वडिलांकडे धाव घेतली. मात्र, यावेळी श्रीरंग शेजूळ यांच्या अंगावर कसलेतरी द्रव टाकलेले त्यांना दिसले. अंग भाजत असल्याने श्रीरंग शेजूळ मोठ-मोठ्याने ओरडत होते. आजूबाजूला पाहिले असता कुणीच दिसून आले नाही. त्रास अधिक होत असल्याने उत्तम शेजूळ यांनी आपल्या वडिलांना सामान्य रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. दरम्यान, सोमवारी श्रीरंग शेजूळ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या प्रकरणी गावातील संशयित नंदू किशोर शेजूळ याने तीन महिन्यांपूर्वी आमच्या कुटुंबाला धमकी दिली होती. तसेच नंदू भटकर साबळे (रा. म्हसरूळ) यानेही यापूर्वी वडिलांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे उत्तम शेजूळ यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या दोघांनीच आपल्या वडिलांच्या अंगावर जीवे मारण्याच्या उद्देशाने ज्वलनशील पदार्थ टाकले असल्याचे उत्तम शेजूळ यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. त्यामुळे पोलिसांनी तापसाचे चक्र फिरवत संशयित नंदू किशोर शेजूळ याला ताब्यात घेतले असून, त्याच्या घरातून अॅसिड जप्त केले आहे. तर त्याच्या विरोधात जाफराबाद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

गणपती बाप्पांना घरात आणताना पाय घसरल्याने युवकाचा मृत्यू…

जन्मदात्या मुलाने वडिलांची हत्या करून मृतदेह फेकला नदीत; पण…

सापावर पाय पडल्याच्या भीतीनंतर चिमुकल्याचा घाबरुन मृत्यू…

शिक्षक कारचे पेढे वाटण्यासाठी गेले अन् कार कोसळली विहिरीत…

सैराटची पुनरावृत्ती! दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने केली हत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!