डॉक्टरने केला तीन युवतींवर अत्याचार; प्रायव्हेट पार्टवर गोंदवले नाव…

मुंबई : मुंबईमधील मालवणी भागातल्या डॉक्टरने तीन महिलांवर लैंगिक अत्याचार केला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. योगेश सुनील भद्र भानुशाली (वय ३३) असे या डॉक्टरचे नाव आहे. एका 21 वर्षीय युवतीने डॉक्टरबद्दल पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. डॉक्टर भानुशालीवर 21 ते 24 वर्ष वयाच्या आणखी दोन युवतींनी लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

एका पीडित युवतीने तिच्या प्रायव्हेट पार्टवर डॉक्टरचे नाव गोंदवून घेतल्याचे वकिलाचे म्हणणे आहे. एका युवतीने दाखल केलेल्या प्राथमिक तक्रारीमुळे डॉ. भानुशालीला 29 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर, मालवणी पोलिसांनी आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल केला, ज्यात आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप 23 वर्षीय युवतीने केला आहे. शिवाय, लग्नाच्या बहाण्याने तिच्याकडून सुमारे साडेतीन लाख रुपये घेतल्याचे म्हटले आहे. डॉक्टरने या सर्व महिलांशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मैत्री केली होती, असे पोलिसांनी सांगितले.

एका २१ वर्षीय पीडित युवतीने पोलिसांना दिलेल्या जबाबात खुलासा केला की, ‘इन्स्टाग्रामच्या माध्यमातून डॉक्टर सोबत ओळख झाली होती आणि पुडे मैत्रीचं प्रेमात रुपांतर झाले. डॉक्टरने त्याच्या राहत्या तिच्या गळ्यात मंगळसूत्रही घातले आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तसेच तिच्याकडून 60 हजार रुपये उसने घेतले. पुढे काही दिवस संबंध ठेवले. पण, काही दिवसानंतर डॉक्टरने अचानक तिच्याशी असलेले संबंध तोडले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने गेल्या महिन्यात मालवणी पोलिसांत तक्रार दाखल केली.

एका 23 वर्षीय पीडित युवतीने तक्रारीत म्हटले आहे की, ‘गेल्या वर्षी तिची इन्स्टाग्रामवर डॉ. भानुशालीशी मैत्रीही झाली होती. त्याने लग्नाचे वचन दिले आणि तिची त्याच्या कुटुंबीयांशी ओळख करून दिली. तिने अनेक वेळा त्याच्या निवासस्थानी भेट दिली, जिथे त्याने बलात्कार केला आणि वैयक्तिक गरजा सांगून रोख रक्कम आणि सोन्याची चेनही घेतली.’

दरम्यान, पीडित युवती जेव्हा न्यायालयात भेटल्या तेव्हा त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. आरोपी डॉक्टरने दुसऱ्या पीडितेला तक्रार न करण्याची विनंती केली, पण, युवतींनी त्याची ही विनंती फेटाळली. आणखी मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून रोखण्यासाठी डॉक्टरला तुरुंगात टाकावे, अशी मागणी पीडितांनी केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

डॉक्टर, डॉक्टर खेळण्याच्या बहाण्यातून अल्पवयीन मुलीवर अत्याचार अन् गरोदर…

धक्कादायक! डॉक्टरने उपचारासाठी आलेल्या महिलेचा केला विनयभंग…

दुसऱ्या विवाहाचे फोटो ठेवले स्टेटसला, पहिल्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या…

महिला डॉक्टरची सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, गुन्हा दाखल…

Video: युवतीला चुकीचे इंजेक्शन अन् आई-वडिलांसमोरच सोडला जीव…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!