चुलतीचे लहान पुतण्यासोबत जुळले प्रेमसंबंध अन् नको ते घडलं…

लखनौ (उत्तर प्रदेश) : एका चुलतीचे तिच्या पुतण्यासोबत प्रेमसंबध जुळले होते. दोघांच्या प्रेमाची कुटुंबियांना माहिती समजल्यानंतर विरोध करण्यात आला होता. प्रेमाला विरोध होत असल्याचे समजल्यानंतर दोघांनी रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना गोंडा येथे घडली आहे.

महिलेच्या आत्महत्येमुळे तिची दोन लहान मुले उघड्यावर पडली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इटियाथोक परिसरात राहणारी विधवा महिला (वय ३२) तिच्या दोन मुलांसह सासरच्या घरी राहत होती. महिलेचा पुतण्या रवींद्र कुमार (वय २२) हा सुद्धा याच घरात राहत होता. दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले. महिलेला आठ वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी आहे. दोघांच्या प्रेमाला घरच्यांनी विरोध केला होता.

रवींद्रच्या आई-वडिलांना त्याचे लग्न दुसरीकडे करायचे होते. मात्र, चुलती लग्न जमवून देत नव्हती. पुतण्याही लग्नाला विरोध करत होता. काकू आणि पुतण्याला समाज आणि कुटुंबाचा विरोध सहन झाला नाही. अखेर दोघांनी रविवारी रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. कठोवा रेल्वे क्रॉसिंगजवळ ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले.

पोलिसकाका Video News: २९ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरपणे हत्या; आरोपी कोण पाहा…

चिमुकलीने चुलतीला नको त्या अवस्थेत पाहिलं अन् नको ते घडलं…

चुलती झोपली असताना हळूच पुतण्या आला अन्…

चुलतीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाची माहिती चुलत्याला समजली अन्…

नवविवाहितेला नको त्या अवस्थेत सासूने पाहिले अन् बसला धक्का; युवक निघाला…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!