
मनोज जरांगे यांची पुण्यात सभा; वाहतूकीत बदल…
पुणे (सुनिल सांबारे): पुणे-नगर रस्त्यावरील खराडी जवळ असलेल्या महालक्ष्मी लॉन्स येथे मराठा समाजाची सभा सोमवारी (ता. २०) सकाळी अकरा वाजता सभा होणार असून मनोज जरांगे पाटील हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी वाहतूकीत बदल करण्यात आला आहे.
खराडी, चंदननगर, वाघोली येथील मराठा तरुणांनी एकत्रित येऊन या सभेचे आयोजन केले आहे. जरांगे पाटील हे १९ नोव्हेंबरला आळंदीत मुक्कामी आहेत. तेथून ते दर्शन घेऊन तुळापूर येथे येणार आहेत. तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन ते खराडी येथील सभेला उपस्थित राहणार आहेत. सभेला सुमारे एक लाख नागरिक येतील, असा अंदाज वर्तविला आहे. सुमारे २० एकरच्या मैदानावर सभा होईल. पार्किंगसाठी सुमारे १५ एकर जागा राखीव ठेवण्यात आली आहे.
सभेकरीता येणाऱ्या नागरीकांची वाहने एकाचवेळी नगर रोडवर येणार असल्याने संपूर्ण नगर रोडवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. तसेच दिपावली सणाच्या सुट्टया संपल्याने गावाहून परतणारे नागरीक (स्टिनॉग क्राऊड) यांच्या वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात असणार आहे. त्यामुळे नगर रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिंपरी-चिंचवड बाजूकडून पुणे बाजूमार्गे नगररोडवर जाणारी जड अवजड वळविणे आवश्यक आहे.
पुणे-नगर रस्त्यावरून पुण्यात येणारी सर्व वाहने हडपसरच्या बाजूने वळवण्यात येणार आहे. हडपसर सासवडकडून साताऱ्या कडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी सोलापूर रोड मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शिक्रापूर येथून पुणे शहराकडे येणारी वाहने चाकण भोसरी मार्ग वापरत पुणे मुंबईकडे जाणार आहेत. तर खराडी बायपासवरून जुना पुणे मुंबई रोडवरील वाहने हडपसर मार्गे पुण्यात जाणार आहेत.
दिवसभर नगर रोडवर जड वाहतुकीस पूर्णपणे बंदी असेल. नगर रस्त्यावरून पुण्यात येणारी सर्व वाहने हडपसरच्या बाजूने वळवण्यात येणार असून, हडपसर सासवड कडून साताऱ्या कडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी सोलापूर रोड मार्गाचा वापर करावा.
तसेच शिक्रापूर येथून पुणे शहराकडे येणारी वाहने चाकण भोसरी मार्ग वापरत पुणे मुंबईकडे जातील तर खराडी बायपास वरून जुना पुणे मुंबई रोडवरील वाहने हडपसर मार्गे पुण्यात येतील.
पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे होणेकरीता, महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र. एम. व्ही. ए. ०९९६/८७९/सी आर ३०/टी आर ए २, दिनांक २७/०९/१९९६ रोजी तात्पुरते स्वरुपात वाहतूक बदल करण्यात येत आहेत.
निगडी, तळवडे, भोसरी, चाकण वाहतुक विभाग अंतर्गत
पिंपरी चिंचवड बाजूकडून पुणे बाजूमार्ग नगररोडकडे जाण्यास सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग क्र:- १. जुना मुंबई पुणे हायवेवरून येणारी जड अवजड वाहने भक्ती शक्ती
चौक- मोशी टोल नाका- चाकण- शिक्रापुरमार्गे नगरकडे जातील.
पर्यायी मार्ग क्र:- २. पिंपरी चिंचवड परिसरातील जड / अवजड वाहने नाशिकफाटा
भोसरी- चाकणमार्गे नगरकडे जातील.
पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे हद्दीत वर नमुद केले प्रमाणे तात्पुरते स्वरुपात वाहतूक बदल (अत्यावश्यक सेवेतील वाहने उदा. पोलीस अॅम्ब्युलन्स, फायरब्रिगेड, पेट्रोल, डिझेल टँकर, पीएमपीएमएल बसेस, स्कुल बस वगळून) करण्यात येत असुन सदर वाहतूक बदलाची अधिसुचना निर्गमित करण्यात येत आहे तरी नागरीकांनी दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
मराठा आंदोलनानंतर गृहविभागाचे पोलिसांना महत्त्वाचे आदेश…
महाराष्ट्र बंदबाबत मेसेज व्हायरल; पोलिसांकडून आवाहन…
नवले पुलावरील जाळपोळप्रकरणी 400 ते 500 जणांवर गुन्हे दाखल…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!