हृदयद्रावक! आईची दोन्ही चिमुकल्यांना घेऊन मारली विहिरीत उडी…

धुळे : आईने आपल्या दोन 3 आणि 6 वर्षांच्या मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना निकुंभे शिवारात शनिवारी दुपारी (ता. १५) घडली आहे. गायत्री आनंदा वाघ-पाटील (वय 27 ), मुलगा दुर्गेश (वय 6) आणि मुलगी दुर्वा (वय 3) अशी मृतांची नावे आहेत. कौटुंबिक वादांमुळे नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहिती पुढे आली असून, पोलिस तपास करत आहेत.

सोनगीर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गावात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. विहिरीत सुमारे 30 ते 40 फूट खोल पाणी असल्याने ही घटना लगेच लक्षात आली नाही. तिघांचे मृतदेह बाहेर काढल्यानंतर गावात शोककळा पसरली. गावकऱ्यांनी या घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली आहे. मुलांचे निष्पाप मृतदेह पाहून अनेकांचे डोळे पाणावले. या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण निकुंभे गाव शोकात बुडाले आहे.

प्राथमिक चौकशीतून असे दिसून आले आहे की, गायत्री काही दिवसांपासून मानसिक तणावात होती. कुटुंबातील वाद, मतभेद आणि वाढत चाललेलं नैराश्य या सर्व कारणांमुळे तिने टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस अधिक तपास करत आहेत.

हृदयद्रावक! कामवाल्या बाईने खिडकीतून पाहिलं अन् हादरलीच…

हृदयद्रावक! नदीत वाहून जाणाऱ्या चिमुकल्याला बापाने वाचवलं पण…

हृदयद्रावक! आईच्या कुशीतून उचलून नेत बाळाला ड्रममध्ये बुडवून मारलं अन्…

हृदयद्रावक! नवविवाहित मयुरीने वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी घेतला गळफास…

हृदयद्रावक! माझ्या जिवलग मित्रांनो, माझी जाण्याची वेळ आली आहे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!