आईस्क्रीममध्ये सापडलेल्या बोटाचे गूढ उकललं…
मुंबई : मुंबईतील मालाड परिसरात एका महिलेला आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. पण, आईस्क्रीममध्ये सापडलेले बोट पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील फॉर्च्यून डेअरी या कंपनीतील कामगाराचेच असल्याचे डीएनए चाचणीतून स्पष्ट झाले आहे. तसा अहवाल गुरुवारी न्यायवैद्यक प्रयोगशाळेने मालाड पोलिसांना दिला आहे. ही घटना घडल्यानंतर इंदापूर येथील फॉर्च्युन डेअरीला उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
ओमकार पोटे असे या कर्मचाऱ्याचे नाव असून 11 मे रोजी क्रशिंग मशीनवर काम करताना त्यांचा अपघात झाला होता. त्यामध्ये त्यांचे बोट कापले गेले आणि कापलेले बोट आईस्क्रीममध्ये पडले होते. अपघताबाबत माहिती मिळाल्यानंतर फॉर्च्यून डेअरीने तयार झालेले सर्वच आईस्क्रीमची विल्हेवाट लावणे अपेक्षित होते, मात्र तसे घडले नाही. हे आईस्क्रीम महिनाभराने 12 जून रोजी मालाड येथीस एका डॉक्टरच्या हाती लागले होते.
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालात बोटाच्या भागाचा डीएनए आणि आईस्क्रीम फॅक्टरीचे कर्मचारी ओंकार पोटे यांचा डीएनए एकच असल्याचे आढळले आहे. इंदापूर कारखान्यात आईस्क्रीम भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान पोटे यांच्या मधल्या बोटाचा एक भाग कापला गेला होता. हे बोट मालाडच्या डॉक्टरांनी मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनमध्ये सापडले होते. त्यानंतर डॉक्टरांनी अधिकाऱ्यांना माहिती दिली.’
Video: आईस्क्रीममध्ये बोटानंतर सापडली गोम…
आईस्क्रिममध्ये सापडलेल्या बोटाबाबत पोलिसांकडून मोठा खुलासा…
Video: आईस्क्रीममध्ये बोटानंतर सापडली गोम…
मुंबईत आईस्क्रिममध्ये सापडलेल्या बोटाचे पुणे कनेक्शन; कंपनी म्हणाली…
मुंबईत महिलेला आईस्क्रीम खाताना कोनमध्ये सापडलं माणसाचं बोट…
बापरे! पाण्याच्या सीलबंद बाटलीत आढळली मेलेली पाल…
संतापजनक Video: आईस्क्रीमवाला हस्तमैथुन करून ग्लासमध्ये टाकत होता वीर्य…
नवऱ्यासोबत मैत्रिणीला रंगेहात पकडल्यावर मैत्रिणीला गेटला बांधले अन्…
हृदयद्रावक! एक तासापूर्वी माहेरी आलेल्या नवविवाहितेचा वीज पडून मृत्यू…
डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीची आत्महत्या…
क्लास वन अधिकारी असलेल्या सुनेने संपत्तीसाठी काढला सासऱ्याचा काटा…
मुंबई विमानतळावर महिलांची सोन्याची तस्करी करण्याची पद्धत पाहून अधिकारी चक्रावले…