पुणे जिल्ह्यात मोटारसायकल चोरांना अटक; १४ दुचाकी हस्तगत…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पुणे जिल्ह्यातील मंचर पोलिसांनी मंचर, खेड, चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोटारसायकल चोरांना अटक केली असून, १४ मोटार सायकली हस्तगत केल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मंचर (ता. आंबेगाव जि. पुणे) येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या सूचनेनुसार मोटरसायकल चोरांचा शोध घेत असताना मंचर पोलिस स्टेशनचे परिसरात त्यांना तीन जण विना नंबरची मोटर सायकल वरून जात असताना पोलिस पथकाला आढळले. त्या वाहनाबाबत चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणती कागदपत्रे आढळली नाही. मोटरसायकल बाबत चौकशी केली असता ती मोटरसायकल मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोरीची आसल्याचे आढळले.

policekaka-special-offer
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारले जातात त्यांनी त्यांचे नाव 1) सुरज संतोष बिडकर (रा. साकोरे ता. आंबेगाव जि. पुणे) असे सांगितले व त्याचे दोन सोबत अल्पावयीन साथीदार असल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपी सुरज संतोष बिडकर याला न्यायालयामध्ये समक्ष हजर केल्या असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी दिली. त्यानुसार इतर दोन अल्पवयीन बालकांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी अशाच प्रकारच्या अनेक मोटार सायकली चोरी केल्याचे सांगितले. त्यांनी हिरो होंडा, हिरो, व इतर कंपनीच्या १४ मोटरसायकल काढून दिल्या. सदर वाहनांची माहिती घेतली असता त्यापैकी नऊ मोटर सायकल मालकांचा शोध घेतला असता 14 वाहनांपैकी काही मोटरसायकल चोरीचे गुन्हे मंचर, खेड, चाकण पोलिस स्टेशनला नोंद झाल्याचे आढळले. पाच मोटर सायकलच्या बाबतीत माहिती घेऊन पुढील कारवाई पोलिस करत आहेत.

सदर कामगिरी माननीय ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सुदर्शन पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी खेड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरुण फुगे, सहा. पोलिस निरीक्षक बालाजी कांबळे, उपनिरीक्षक सोमशेखर शेटे, पोलिस हवालदार संजय नाडेकर, हवालदार तानाजी हगवणे, पोलिस हवालदार शेखर भोईर, पोलिस कॉ.योगेश रोडे, पोलिस कॉ. अविनाश दळवी, पोलिस नाईक अजित पवार यांनी सदर कारवाई केली.

पुणे जिल्ह्यात दोन अल्पवयीन बहिणींवर अत्याचार अन् बनवला Video…

पुणे जिल्ह्यात लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार…

पुणे जिल्ह्यात इमारतीवरून उडी मारून महिलेची आत्महत्या; चॅटिंगवरून…

पुणे जिल्हा हादरला! मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन, दारू पाजली अन् लॉजवर अत्याचार…

पुणे जिल्ह्यात महिला अनोळखी व्यक्तीसोबत फिरताना दिसली म्हणून केला खून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!