
पुणे शहरात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण दुर्घटना…
पुणे: पुणे शहरातील गंगाधाम चौक परिसरात एका केमिकल कंपनीच्या टाकीतून अचानक गॅस गळती झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. ३०) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. गळतीमुळे वायू परिसरात पसरल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास झाला आहे. बचावकार्य दरम्यान नागरिकांसह अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान यांनाही वायूची बाधा झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गंगाधाम चौक परिसरातील एका केमिकल कंपनीतील टाकीतून मध्यरात्री अचानक वायू गळती सुरू झाली. हवेत पसरलेल्या या गॅसमुळे परिसरातील नागरिकांना खोकला आणि श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला. पाहता पाहता २४ जणांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमारे ३० जवानांनी बीए सेट (Breathing Apparatus) परिधान करून कंपनीच्या आवारात प्रवेश केला. वायू गळती रोखण्यासाठी जवानांनी मोठ्या धाडसाने बचावकार्य राबवले. मात्र, या ऑपरेशन दरम्यान अग्निशमन दलाचे एक अधिकारी आणि एक जवान यांनाही वायूची बाधा झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले. अग्निशमन दलाच्या ३० जवानांच्या अथक परिश्रमानंतर गॅस गळती रोखण्यात यश आले असून आता परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आहे.
पुणे शहरात कुख्यात तडीपार गुंडाची कोयत्याने सपासप वार करून हत्या…
पुणे शहरातील बुधवार पेठेत पोलिसांची मोठी कारवाई…
पुणे! युवकानं PMPML बस का पळवली? पोलिस तपासात धक्कादायक माहिती…
पुणे शहरात सलूनमध्ये अंदाधुंद गोळीबार; पोलिसांनी जिवाची पर्वा न करता घातली झडप…

