पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७८वी कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील येरवडा पोलिस ठाणे हद्दमधील सलमान कुरेशी (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०५ साथीदार यांचेविरुध्द मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत केलेली ही ७८वी कारवाई आहे.
फिर्यादी हे १३/०९/२०२३ रोजी महाड ते पुणे एस. टी. बसने चांदणी चौकात रात्री येवून, फिर्यादी यांचे मित्राचे ओळखीचे योगेश ऊर्फ नरेंद्र नवघणे यास फोन करून, फिर्यादी यांना पुणे शहरातून एक मोटार सायकल विकत घ्यावयाची असल्याने, फिर्यादी यांनी त्यांना घेण्यासाठी योगेश ऊर्फ नरेंद्र यास चांदणी चौक येथे बोलावले होते. त्याप्रमाणे योगेश ऊर्फ नरेंद्र नवघणे हा त्याचे कारमध्ये त्याचा मित्र शिवकुमार उर्फ शिवा शेलार यास घेवुन आल्यानंतर, फिर्यादी हे त्यांचेबरोबर जेवण करणेसाठी फिरत पुणे स्टेशन येथे फिरत येरवडा येथील चिमाघाट येथे ब्रिजचे खाली येवून थांबले होते.
सदर ठिकाणी सलमान कुरेशी, दुर्गेश सातकर, आकाश भंडारी व अनुज जोगदंड यांनी फिर्यादी यांचेजवळ येवुन, तुम्ही इथे काय करता असे बोलुन, त्यांचेशी भांडण काढून शिवीगाळ व हाताने मारहाण करून, दुर्गेश सातकर याने फिर्यादींचे खिशात हात घालुन, पैसे काढत असताना, फिर्यादी यांनी दुर्गेश सातकर यास प्रतिकार केला असता, त्याने त्याचेकडील धारदार चाकू काढून फिर्यादी यांचे डावे मनगटावर व डावे गुडघ्यावर वार करुन, फिर्यादी यांचे खिशातील ९०,०००/- रुपये जबरदस्तीने काढून घेतले. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून येरवडा पोलिस स्टेशन गु.र.नं.६३३ / २०२३, भा.दं.वि. कलम ३९४,३९५,३९७, १२० (ब), ३४ अन्वये गुन्हा दाखल आहे.
तपासा दरम्यान यातील आरोपी
१ ) सलमान फारुख कुरेशी, वय – २३ वर्षे, रा. दरबार बेकरी, लक्ष्मीनगर,येरवडा पुणे ( टोळी प्रमुख)
२) शिवकुमार उर्फ शिवा संजय शेलार, वय – २१ वर्षे, रा. भाजी मंडई, चित्राचौक,येरवडा, पुणे
३) दुर्गेश संजय सातकर, वय – २१ वर्षे, रा. सर्व्हे नं १०, शनि आळी, वडार वस्ती, येरवडा, पुणे
४) योगेश ऊर्फ नरेंद्र दिलीप नवघणे, वय – ३० वर्षे, रा. गोकुळ नगर, कात्रज, पुणे
५) आकाश ऊर्फ दशरथ हनुमंत भंडारी, वय – २३ वर्षे, रा. स.नं. १०, वडार वस्ती, येरवडा पुणे
६ ) अनुज सोमनाथ जोगदंड, वय – २० वर्षे, रा. पर्णकुटी येरवडा पुणे (टोळी सदस्य) यांना अटक करण्यात आलेली आहे.
सदर आरोपी सलमान फारुख कुरेशी (टोळी प्रमुख) याने त्याचेसह अन्य सदस्यांसाठी आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्ह्यात नवीन साथीदार सोबत घेवुन स्वतःचे संघटीत टोळी तयार करुन, स्वतःचे टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी गुन्हे केले असून, त्यामध्ये घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापुर्वक दुखापत पोहचवणे, प्राणघातक हत्यार जवळ बाळगणे व त्याचे सहाय्याने परिसरात दहशत निर्माण करणे, जबरी चोरी करणे,दरोडा / मृत्यु किंवा जबर दुखापत घडवून आणण्याचे प्रयत्नां सहीत जबरी चोरी / दरोडा घालणे, स्वतःचा व टोळीचा आर्थिक फायदा होण्याचे गैरहेतूने अवैध दारू विक्रीतुन अवाजवी नफा कमवून त्यातून शासकीय महसूल बुडवणे असे गुन्हे वारंवार केलेले आहेत. त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केले आहेत. आरोपी यांनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने बेकायदेशिरपणे स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्या साठी सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने, तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन१९९९ चे कलम ३ (१)(ii),३(२), ३(४) प्रमाणे अंतर्भाव करण्यासाठी दाखल गुन्ह्याचे तपासी अधिकारी सहा पोलिस निरीक्षक महेश लामखडे यांनी वरीष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम, येरवडा पोलिस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उप आयुक्त, परीमंडळ-०४, पुणे, श्री. शशिकांत बोराटे यांचे मार्फतीने अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता.
सदर प्रकरणाची छाननी करुन येरवडा पोलिस स्टेशन गु.र.नं.६३३/२०२३, भा.दं.वि. कलम ३९४,३९५, ३९७,१२०(ब),३४ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३ (२) ३ ( ४ ) प्रमाणेचा अंतर्भाव करण्याची मा. अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे, रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढीलतपास सहायक पोलिस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर, संजय पाटील हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलिस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त पुणे, संदिप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे, रंजनकुमार शर्मा, पोलिस उप-आयुक्त,परीमंडळ – ०४, शशिकांत बोराटे, सहा. पोलिस आयुक्त संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बाळकृष्ण कदम, पोलिस निरीक्षक, गुन्हे, कांचन जाधव, जयदिप गायकवाड व निगराणी पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक, महेश लामखडे, पोलिस अंमलदार, सचिन माळी, सचिन शिंदे, देविदास वांढरे, प्रकाश चौधरी यांनी केली आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे पोलिस आयुक्तालयाचा कार्यभार स्वीकारल्या नंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारीक लक्ष देवून शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व समाजामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शना खाली मोक्का अंतर्गत केलेली ही ७८ वी कारवाई आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार त्यांची मकोका अंतर्गत ७७वी कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मकोका अंतर्गत ७४वी कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७१ वी कारवाई; पाहा आरोपींची नावे…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे एमपीडीए कारवाईचे अर्ध शतक…
ड्रग माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात…
डेटींग ऍपद्वारे ग्राहकांना आकर्षीत करणारी जोडी सामाजिक सुरक्षा विभागाच्या ताब्यात…
पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…
पुणे शहरात बुलेट सायलेन्सरमधून आवाज काढणाऱ्यांवर कारवाई…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…