महिलेचा पाठलाग, शिवीगाळ करणे आणि ढकलणे हा विनयभंग नाही…

नागपूर : महिलेचा पाठलाग करणे, तिला शिवीगाळ करणे आणि सायकल चालवताना ढकलणे हा विनयभंगाचा गुन्हा ठरत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विनयभंगाच्या एका प्रकरणात निकाल देताना निरीक्षण नोंदवले आहे.

वर्धा येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने एका युवकाविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. सायकल वरून जाताना एका युवकाने पाठलाग केला, शिवीगाळ केली आणि ढकलले असल्याचे तिने तक्रारीदरम्यान म्हटले होते. आयपीसी 354 अंतर्गत वर्धा न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत शिक्षा दिली होती. पुढे हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे गेले तेव्हा या प्रकरण काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत. आरोपीने विद्यार्थिनीला अयोग्यरित्या स्पर्श केला किंवा तिच्या शरीराच्या एखाद्या विशिष्ट भागाला धक्का दिला, ज्यामुळे तिला लज्जा वाटली अशी तक्रारीत कुठेही नोंद नाही.

सायकलवर असताना आरोपीने धक्का दिला, याला तक्रारदाराच्या शालीनतेला धक्का पोहचविणारे कृत्य म्हणता येणार नाही. हे कृत्य आक्षेपार्ह किंवा त्रासदायक असू शकते, परंतु त्यामुळे महिलेचा विनयभंग झाला, महिलेच्या शालीनतेच्या भावनेला धक्का बसला असे म्हणता येणार नाही, असे न्यायालयाचे निरीक्षण नोंदवले. दरम्यान, न्यायालयाने आरोपीची आयपीसी 354 च्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली.

… ‘त्या’ आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल!

नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणी दापोली न्यायालयाचा आरोपीला दणका…

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!