महावितरणचा हलगर्जीपणामळे पती-पत्नीचा जागीच मृ्त्यू…
गोंदिया: विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी पती–पत्नीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला असून, एक महिला गंभीर जखमी झाली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम घाटबोरी/कोहळी येथे ही घटना घडली आहे. पती-पत्नीचा मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ग्राम कोदामेडी ते शिंदिपार मार्गावरील आपल्या शेतात काम करण्यासाठी दोन भाऊ व त्यांची पत्नी असे चार जण शेतात जात होते. यावेळी शेतात तुटून पडलेल्या विद्युत तारेचा शॉक लागून शेतकरी तुळशीदास रेवाराम लंजे (वय 45) व त्यांची पत्नी मायाबाई तुळशीदास लंजे (वय 42) या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इंदुबाई हिरालाल लंजे (वय 43) या जखमी झाल्या आहेत. त्यांचे पती सुधा घटनास्थळी उपस्थित होते. त्यांच्या लक्ष्यात आले की इथे विद्युत पुरवठा चालू आहे. त्यामुळे त्यांनी विद्युत तारेला लाकडी काठीने लांब फेकले. त्यामुळे इंदुबाई हिरालाल लंजे यांचे प्राण वाचवले. त्यांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
लंजे यांच्या शेतातून विद्युत विभागाचे 33 एल. टी. ची लाईन गेली आहे. पाऊस व वाऱ्याने सदर लाईनची तार मागील 5 ते 6 दिवसापासून तुटून पडली होती. याची माहिती काही शेतकऱ्यांनी विद्युत विभागाला दिली होती. मात्र, विद्युत विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने दांपत्याला आपला जीव गमवावा लागला आहे.
दरम्यान, विजेच्या तारा दुरुस्त केल्या असत्या तर हे जीव नक्कीच वाचले असते. या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता स्थानिकांनी केली आहे.
शिक्षक पती-पत्नीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; मुलगा गंभीर…
शेतकरी पती-पत्नीने झाडाला गळफास घेऊन संपवले जीवन…
शिक्षक कारचे पेढे वाटण्यासाठी गेले अन् कार कोसळली विहिरीत…
रस्त्याच्या कडेला नातेवाईकाशी बोलण्यासाठी थांबले अन् घात झाला…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…