सहकारनगर पोलिसांनी पीएमटीमध्ये चोरी करणाऱ्यास शिताफीने केली अटक…

पुणे (संदीप कद्रे): उत्तर प्रदेश या राज्यातून येवून पुण्यात राहुन पीएमटी बसमध्ये प्रवास करणा-या वृध्द नागरीकांना व महिलांना हेरुन त्यांचे सोन्याचे दागीने, मोबाईल, पर्स चोरणाऱ्या सराईत आरोपीस सहकारनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

जिजाबाई लक्ष्मण कदम (वय ७२ वर्षे, धंदा गृहीणी रा. निपाने वस्ती अमृत सिटी सोसायटी, नील बिल्डींग फ्लॅट नं. ४०८, चौथा मजला आंबेगाव खुर्द जांभुळवाडी पुणे) या २८/१२/२०२३ रोजी संध्याकाळी ०६.०० वा. चे दरम्यान पुणे सातारा रोडवरील पद्मावती बसस्टॉप ते बालाजीनगर असा पीएमटी बसमध्ये बसुन प्रवास करीत असताना आहिल्यादेवी चौकात त्यांचे हातातील २ तोळे वजनाची ४०,०००/- रुपये किमतीची सोन्याची बांगडी, लोखंडी कटरच्या सहाय्याने जबरदस्तीने तोडुन चोरी करुन पळुन जाणारा पीएमटी बसमध्ये चोऱ्या करणारा मुळचा उत्तर प्रदेश येथील रहिवाशी असलेला व सध्या कोंढवा भागात राहणारा सराईत गुन्हेगार १ ) चांदबाबु अलीहुसेन शेख (वय ३० वर्षे रा.स.नं.४२, बेचाळीस चौक अलीभाई लेडीज टेलर मागे, कोंढवा खुर्द पुणे. मुळ रा. गाव गौरव काला पोष्ट महमदपुर ता. कैरनलगड जि. गोंडा राज्य उत्तर प्रदेश) यास गस्तीवर असलेले पोलिस हवालदार सुशांत फरांदे व महेश मंडलीक यांनी पाठलाग करुन छत्रपती मंगलकार्यासमोर पकडुन सहकारनगर पोलिस स्टेशन येथे आणले. त्याचे विरुध्द जिजाबाई कदम यांनी फिर्याद दिल्याने सहकारनगर पोलिस स्टेशन गु.र.नं.३५६/२०२३ भादवी कलम ३९२ अन्वये गुन्हा नोंद आहे.

दाखल गुन्हयाचा तपास सुरेंद्र माळाळे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सहकारनगर पोलिस स्टेशन पुणे व संदीप देशमाने पोलिस निरीक्षक (गुन्हे) सहकारनगर पोलिस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी पोलिस उप-निरीक्षक राहुल खंडाळे व तपास पथकाचे स्टाफने सुरु केला. आरोपी चांदबाबु शेख याचे अंगझडतीमध्ये त्याने फिर्यादी यांची जबरदस्तीने चोरलेली ४०,००० /- रुपये किमतीची सोन्याची बांगडी व एक १००/- रुपये किमतीचे लोंखंडी कटर जप्त केले आहे. त्याची पोलिस कस्टडीची रिमांड घेवुन त्याचेकडे अधिक तपास करता त्याने दोन ते आडीच महिन्यापुर्वी एक महिलेची पीएमटी बसमध्ये बालाजीनगर येथे पर्स चोरुन त्यामधील २५,०००/- रुपये किमतीचे अर्ध्या तोळयाचे कानातील टॉप्स व २००० /- रुपये चोरल्याची माहिती दिली. त्यावरुन तपास करता सदर बाबत सहकारनगर पोलिस स्टेशन येथे गु.र.नं. २६८ / २०२३ भादवी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा नोंद असुन त्याचे कोंढवा येथील राहते घरातुन २५,०००/- रुपये किमतीचे अर्ध्या तोळयाचे कानातील टॉप्स जप्त करण्यात आले आहेत. आरोपीस पकडुन सहकारनगर पोलिस स्टेशनकडील १) सहकारनगर पोलिस स्टेशन येथे गु.र.नं. २६८ / २०२३ भादवी कलम ३७९ प्रमाणे व २) सहकारनगर पोलिस स्टेशन येथे गु.र.नं.३५६ / २०२३ भादवी कलम ३९२ प्रमाणे हे दोन गुन्हे उघडकीस आणुन ६५,००० /- रुपये किमतीचे सोन्याचे दागीने जप्त केले आहेत.

पोलिसांमार्फत महिला व वृध्द नागरीक यांना अवाहन करण्यात येते की, सार्वजनीक बसमधून प्रवास करताना सतर्कता बाळगुन काहीही संशयास्पद प्रकार आढळून आल्यास पोलिस कंट्रोल रुम नंबर ११२ अथवा महिला हेल्पलाईन नंबर १०९१ यावर तात्काळ मदतीसाठी संपर्क साधावा.

सदरची कामगीरी अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त, परिमंडळ-२, स्मार्तना पाटील, सहा. पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, पोलिस निरीक्षक संदीप देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलिस स्टेशन तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बापु खुटवड, पोलिस अंमलदार सुशांत फरांदे, महेश मंडलिक, बजरंग पवार, नवनाथ शिंदे, अमोल पवार, निलेश शिवतरे, भुजंग इंगळे, सागर सुतकर, सागर कुंभार, विशाल वाघ यांनी केली आहे.

kashmir
kashmir

सहकारनगर पोलिसांनी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्याला केले जेरबंद…

सहकारनगर पोलिसांनी दोन सराईत गुंडांना केले जेरबंद…

पुणे शहरात पोलिसांसमोरच कोयता गँगने युवकांवर केला हल्ला…

पुणे पोलिस! साडेतीन वर्षांनतर उलगडले महिलेच्या खुनाचे रहस्य…

पुणे शहरात वरिष्ठ व्यवस्थापक महिलेला म्हणाला, फक्त एक ‘किस’ दे अन् पुढे…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!