भोसरी पोलिसांकडून सराईत गुन्हेगार ४८ तासात जेरबंद…

पुणे (सुनिल सांबारे): भोसरी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये चैन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना भोसरी पोलिसांनी ४८ तासात जेरबंद केले आहे. त्यांच्या ताब्यातून मु्द्देमाल जप्त करण्यात आला असून, याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

दिनांक २७.०७.२०२३ रोजी सकाळी ०५/४५ वा. चे सुमारास भोसरी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये नटीज चपाती सेंटर, सकुबाई गार्डन जवळ, गवळी नगर, भोसरी पुणे याठिकाणी मोटार सायकलवरुन आलेल्या अनोळखी दोन चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावून चोरी केली होती. त्यानंतर थोड्याच वेळात भोसरी परीसरामध्ये आणखी दोन वेगवेगळ्या ठिकाणी अशाच पध्दतीने मोटार सायकल वरुन आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावून चोरटे मोटार सायकलवर निघून गेल्याच्या घटना घडल्या होत्या.

सदर घटनेमध्ये चोरट्यांनी नंबर प्लेट नसलेली मोटार सायकल व अंगात काळे रेनकोट परीधान करुन तोंड रुमालाने झाकून ओळख लपविण्याचा पुर्ण प्रयत्न केला होता. एकाच वेळी भोसरी पोलिस स्टेशन हद्दीत तीन चैनचोरीच्या गंभीर घटना घडल्याने पोलिस उपायुक्त परि- १ विवेक पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त, पिंपरी विभाग सतीश कसबे तसेच भोसरी पोलिस स्टेशनचे व पो.नि. भास्कर जाधव यांनी घटनास्थळी भेट देवुन तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना अनोळखी चोरट्यांचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना केल्या होत्या. आरोपींनी आपली ओळख उघड होणार नाही याची पुर्ण खबरदारी घेतल्याने व पाऊस असल्याने सी.सी.टी.व्ही. फुटेजमध्ये आरोपीबाबत कोणतीही स्पष्ट माहिती मिळून येत नव्हती.

तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार परीसरातील यांनी घटना घडलेल्या परीसरात बारकाईने पाहणी करुन मुख्य रस्त्यासह गल्लीबोळातील १५० पेक्षा जास्त सी. सी. टी. व्ही. कॅमेरे तपासुन चैनचोरी करणारे अज्ञात चोरट्यांना परतीच्या मार्गावर माग घेतला, तेव्हा आरोपी हे दिघी परीसरात गेलेले असल्याची माहीती मिळाली. त्यानंतर तपास पथकाने आरोपीची ओळख पटविली व २९/०७/२०२३ रोजी पोलिस उप निरीक्षक मुकेश मोहारे यांना गोपनीय बातमीदाराकडून सदर गुन्ह्यातील आरोपी हे सी.एम. ई. भिंतीलगत आदर्शनगर दिघी परीसरात बसले असल्याची माहीती मिळताच तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी वेगवेगळे पथके तयार करुन दिघी परीसरात सी. एम. ई भिंतीलगत कौशल्यपुर्ण पध्दतीने छापा टाकला.

सदर गुन्ह्यात आरोपी राहुल रमेश चव्हाण (वय २४ वर्षे रा. भारतमातानगर दिघी पुणे) व करणसिंग सुरजितसिंग भादा (वय २०, रा. दिघी पुणे) यांना ताब्यात घेतले. त्यांनी तपासात सदर गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडे तपास केला असता त्यांचेकडून भोसरी पोलिस स्टेशनचे तीन चैनचोरी, दोन घरफोडी, दोन चोरीचे असे एकुण ०७ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्यांच्याकडुन एकूण ४,३९,००० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करणेत यश आलेले आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलिस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त परिमंडळ १ विवेक पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त, पिंपरी विभाग सतीश कसबे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक कल्याण घाडगे, पोलिस उप-निरीक्षक मुकेश मोहारे, तसेच सहा. पोलिस फौज. राकेश बोयणे, पो. अं. हेमंत खरात, नवनाथ पोटे, सागर जाधव, सचिन सातपुते, प्रभाकर खाडे, तुषार वराडे, आशिष गोपी, स्वामी नरवडे, महिला अंमलदार प्रतिभा मुळे, सुषमा पाटील, भाग्यश्री जमदाडे यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

पिंपरी-चिंचवड हद्दीत दुचाकी चोरी व घरफोडीचे गुन्हे उघड…

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना घेतले ताब्यात…

पिंपरी-चिंचवड पुन्हा हादरले! युवकाची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या…

चिखली पोलिसांनी मैत्रिणीस ताब्यात घेत गुजरातमध्ये जाऊन आरोपीस ठोकल्या बेड्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!