पुणे शहरात मोलकरीणचे काम मिळवून चोरी करणाऱ्या महिलेला अटक…
पुणे (संदिप कद्रे): घरात मोलकरीणचे काम मिळवून चोरी करणाऱ्या महिलेला येरवडा तपास पथकाकडून अटक करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास येरवडा पोलिस करत आहेत.
कल्याणीनगर येथील उच्चभ्रू सोसायटीमध्ये २८/०५/२०२४ रोजी सायं. १९.०० वा चे सुमारास घरातील मोलकरीण हि फिर्यादी यांचे कपाटातून १३,३६,८००/- रु किंमतीचे २६० ग्रॅम वजनाचे सोन्या चांदीचे दागिने चोरी करुन घेवून गेली आहे. याबाबत येरवडा पो. स्टे. गु. र. नं. ३३५/२०२४ भादवि ३८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास करत असताना तपास पथकातील पोलिस अंमलदार पोहवा तुषार खराडे, किरण घुटे व पोअं सुशांत भोसले यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी ही तिचे मुळ गावी किन्हई (ता कोरेगाव जि सातारा) येथे असलेबाबत माहिती प्राप्त झाली. सदरची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक येरवडा पोलिस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेली माहिती वरुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे तपास पथकाचे पोउपनि स्वप्निल पाटिल, पोअं तुषार खराडे, कैलास डुकरे, सुशांत भोसले, मपोअं शामलता देवकर यांनी तेथे जावून संशयीत महिला सायली संतोष कार्वे (वय २२, रामु पो किन्हई ता कोरेगाव जि सातारा) हिला ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी करता तिने कल्याणीनगर भागात लहान मुलाचा सांभाळ करणेचे काम मिळवून सदर घरात प्रवेश करुन तेथील घरात चोरी केलेची कबूली दिली. सदर आरोपीस दि. ३१/०५/२०२४ रोजी अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.
पोलिस कस्टडीदरम्यान सदर आरोपीकडून १३, ११,८००/- रू किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच तिचेकडे अधिक तपास करता तिने आंबेगाव परिसरात सुध्दा एका घरात लहान मुलगा सांभाळण्याचे काम मिळवून तेथे सुध्दा चोरी केलेची कबुली दिली. त्यावरुन भारती विदयापीठ पोलिस स्टेशनच्या अभिलेखाची पाहणी करता भारती विदयापीठ पो स्टे गु र नं ४४९/२०२४ भादवि ३८१ गुन्हा उघडकीस आला आहे. सदर गुन्हयातील ६४ ग्रॅम वजनाचे ४,००,००/- किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. असे एकूण २ गुन्हे उघडकीस आणून १७,११,८००/- रू किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मनोज पाटील, अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, विजयकुमार मगर, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ – ४, विठ्ठल दबडे, सहा. पोलिस आयुक्त, येरवडा विभाग, रविंद्र शेळके, वपोनि येरवडा पो स्टे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि स्वप्निल पाटील, श्रेणी पोउपनि प्रदिप सुर्वे, पोहवा गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, कैलास डुकरे, पोना सागर जगदाळे, पोअं अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले यांनी केलेली आहे.
मुंढवा पोलिसांनी खुनातील आरोपीस एक तासाच्या आत केली अटक…
पुणे शहरात व्यावसायिकाची गोळ्या झाडून आत्महत्या…
पुणे पोर्श कार अपघात प्रकरण! विशाल अगरवाल याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल…
पुणे शहरातील नांदेड सिटी भागात धुणी-भांडी करण्याच्या नावाखाली चोरी…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…