औरंगजेबाचे स्टोरी स्टेटसवर ठेवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): मंचर (ता. आंबेगाव) येथे इंस्टाग्राम आयडीवर स्टोरी स्टेटस ठेवल्यावरून अरबाज अब्बास मोमीन, साहिल शेख या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

अरबाज अब्बास मोमीन, साहिल शेख या दोघांनी आपल्या मोबाईल वरून त्यांच्या ईस्ट आयडीवर किंग ऑफ हिंदुस्तान अबुल मुजफ्फर मुही -उद -दीन ‘ मोहम्मद औरंगजेब आलमगीर’ ठेवून त्याखाली औरंगजेबाचा फोटो ठेवत, विलादत मुबारक ०३ नोव्हे १६१८ अशी स्टोरी ठेवली. तसेच सोळा सेकंदाचा औरंगजेबाचा व्हिडिओ तयार करून ‘नाम बदलने से इतिहास नही बदलता’ असे शब्द असलेला मजकूर ठेवून तो इंस्टाग्राम आयडी मीडियावर स्टोरी ठेवून इतर लोकांना पाठवला होता.

दोघांनी दोन समाजात जाती- धर्मात लोकांच्या भावना दुखावण्याच्या उद्देशाने हेतू पुरस्कर कृत्य केले असले बाबत निदर्शनास आले होते. शिवाय, दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर असे कृत्य कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी भा द वि कलम ५०५ (२) प्रमाणे कायदेशीर फिर्याद पोलिस अंमलदार अविनाश कैलास दळवी यांनी मंचर पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली. सदर प्रकरणाचा तपास सहा. पोलिस निरीक्षक साळुंके हे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे मंचर यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे.

वळसे पाटील व देवेंद्र शेठ शहा यांच्या विरोधात आंदोलन करतो काय? म्हणून मारहाण…

बेल्हे-जेजुरी महामार्गावर भीषण अपघातात एकूलता एक मुलगा गमावला…

पुणे जिल्हा हादरला! पित्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार…

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय; तिघींची सुटका…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!