कोंढवा पोलिस ठाणे तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी; २० दुचाकी जप्त…

पुणे: पुणे शहर व पुणे ग्रामीण भागातील डिलेव्हरी बॉय व इतर नागरीकांच्या दुचाकी चोरणा-या अट्टल सराईत ३ चोरट्यांकडून तब्बल २० दुचाकी जप्त करण्यात कोंढवा पोलिसांना यश आले आहे.

कोंढवा पोलिस ठाणे हद्दीत वाहन चोरीच्या गुन्हयाना प्रतिबंध करण्यासाठी तसेच घडलेल्या गुन्हयाचे उकल करण्याचे अनुषंगाने पेट्रोलिंग करुन सीसीटिव्ही फुटेज चेक करुन चोरीची वाहनाचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांनी सुचना दिल्या होत्या. सदर सुचनाप्रमाणे तपास पथक अधिकारी पोलिस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे व त्यांचे तपास पथकाचे पो. अं. संतोष बनसुडे व पो. अं. सागर भोसले हे सीसीटीव्ही फुटेज चेक करीत असताना तसेच पो.हवा. निलेश देसाई यांनी सदर सीसीटीव्ही फुटेज प्राप्त ठिकाणांचे तांत्रिक विश्लेषण करुन संशयित वाहन चोरीचे आरोपी निष्पन्न केले.

सदरचे संशयित आरोपी हे ध्रुव ग्लोबल स्कुलचे मागील बाजूस मोकळ्या ठिकाणी नेहमी येत असल्याबाबतची गुप्त माहिती प्राप्त झाल्याने सदर माहितीच्या अनुषगांने पोलिस अंमलदार सतिश चव्हाण, निलेश देसाई, विशाल मेमाणे, संतोष बनसुडे, सागर भोसले, शाहिद शेख, सुरज शुक्ला, सुजित मदन असे मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी दोन टिम तयार करून गेले होते. सदर ठिकाणी २ दुचाकी लागलेल्या व त्यांचेजवळ ३ इसम गप्पा मारीत असल्याचे दिसले. तेव्हा सदर इसमांना झडप मारून पकडले.
१) गौस मिरासाहब शेख वय २० वर्षे, धंदा- बिगारी, मुळ रा. मु. पो. बावलगाव, ता. औराद, जि. बिदर, कर्नाटक सध्या रा. तात्या हांडे यांचे शेतामध्ये पत्र्याची खोली, बाबा चाजनीजचे पाठीमागे, हांडेवाडी, पुणे
२) शाहरुख कासीम शेख वय २५ वर्षे, धंदा- बिगारी, मुळ रा. मु.पो. गुंडपंत दापका, ता. मुखेड, जि.नांदेड सध्या रा. तात्या हांडे यांचे शेतामध्ये पत्र्याची खोली, बाबा चायनीजचे पाठीमागे, हांडेवाडी, पुणे व
३) जुबेर अहमद मंगरुळे वय २९ वर्षे, धंदा- प्लंबर, मुळ रा. मु.पो. गुडपंत दापका, ता. मुखेड, जि.नांदेड सध्या रा. शिवनगरी पार्क, ममता स्वीटचे बाजुला, दिघी, भोसरी असे असल्याचे सांगितले. त्यांना त्यांचेजवळ असलेल्या वाहनांबाबत चौकशी करता ते उडवाउडवीची उत्तरे देवु लागले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांना पोलिसी खाक्या दाखवून सखोल तपास केला असता वरील आरोपीतांकडुन २ बुलेट, ६ स्प्लेंडर, ३ अॅक्टिव्हा, १ ज्युपिटर, २ शाईन, १ ड्रिम युगा, ३ पॅशन, २ एच एफ डिल्कस अशा चोरी केल्याचे सांगुन नमुद चोरी केलेल्या गाड्या या ग्राहक मिळेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी लपवुन ठेवल्याचे सांगीतले. सदर आरोपी यांच्याकडून एकुण २० चोरीच्या दुचाकी जप्त करून एकुण ७,३०,०००/- रुपये किमतींच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. वरील तीनही आरोपींकडून
१. कोंढवा पोलिस स्टेशन कडील एकुण ९ गुन्हे उघडकीस
२. हडपसर पोलिस स्टेशन कडील एकुण २ गुन्हे उघडकीस
३. भारतीविद्यापीठ पोलिस स्टेशन कडील एकुण २ गुन्हे उघडकीस
४. वानवडी, मुंढवा, लोणीकंद, यवत, चिखली, चिंचवड, या पोलिस स्टेशनकडील प्रत्येकी १ गुन्हा उघडकीस व आध्रं प्रदेश भागातुन चोरी केलेली ए पी २८ बी जे ०५७२ ही दुचाकी देखील चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.

संबंधित कामगिरी ही पोलिस आयु्क्त अमितेशकुमार, रंजनकुमार शर्मा सह पोलिस आयुक्त, मनोज पाटील, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, आर राजा, पोलिस उप आयुक्त परि.०५, धन्यकुमार गोडसे, सहा. पोलिस आयुक्त, वानवडी विभाग, विनय पाटणकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मानसिंग पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पोलिस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलिस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलिस अंमलदार सतिश चव्हाण, निलेश देसाई, विशाल मेमाणे, गोरखनाथ चिनके, सागर भोसले, संतोष बनसुडे, शाहीद शेख, लक्ष्मण होळकर, सुरज शुक्ला, सुजित मदन या पथकाने केली आहे.

पुणे पोर्शे कार अपघातातील धनिकपुत्राच्या वाढल्या अडचणी…

पुणे शहरातील मुलींच्या डोळ्यां देखत खून; अनैतिक संबंधातून पत्नीनेच…

Video: पुणे शहरातील रस्ता खचला अन् दुचाकींसह संपूर्ण ट्रकच गेला खड्ड्यात…

कोंढवा पोलिसांनी अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या टेम्पोसह मुद्देमाल केला जप्त…

कोंढवा पोलिस स्टेशनच्या तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी…

कोंढवा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; पाहा दुचाकींचे क्रमांक…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!