Video: पोलिस अधिकऱ्याचे कार्यालयात वर्दीवरच महिलेसोबत अश्लिल कृत्य…

बंगळूरू (कर्नाटक): एक महिला तक्रार देण्यासाठी आल्यानंतर डीवायएसपी महिलेला घेऊन केबीनच्या बाथरूममध्ये घेऊन गेला. पोलिस अधिकाऱ्याने महिलेसोबत गैरवर्तन केले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

रामचंद्रप्पा (वय ५८) असे गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव असून ते मधुगिरी येथे डीवायएसपी म्हणून तैनात आहेत. कथित व्हिडिओमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकारी महिलेसोबत गैरवर्तन करताना आणि अनुचित वर्तन करताना दिसत आहे.

महिला जमिनीच्या वादातून तक्रार देण्यासाठी आली होती. यावेळी महिलेला पोलिस स्टेशनच्या कार्यालयाच्या बाथरूममध्ये बोलवून लैंगिक शोषण केल्याचा 35 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने कर्नाटकात खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे गृहमंत्र्यांच्या मतदारसंघामध्येच ही घटना घडल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे. पोलिस ठाण्यातच हा प्रकार सुरु असताना खिडकीतून व्हिडिओ केल्याने ही घटना उघडकीस आली आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करून अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधूगिरी शहरातील एका पीडित महिलेने जमिनीच्या वादाच्या संदर्भात तक्रार केल्याने ती डीवायएसपीच्या संपर्कात आली होती. गुरुवारी ही महिला तुमकुरू येथील रामचंद्रप्पाच्या कार्यालयात गेली असताना ही घटना घडली. याठिकाणी डीएसपीने तक्रार ऐकण्यासाठी केबिनमध्ये बोलावले. त्यानंतर तो महिलेशी अश्लील बोलला. महिलेला त्याच्या केबिनशेजारील बाथरूममध्ये नेले. डीएसपीने महिलेचे कपडे खेचले आणि तिच्यासोबत गैरवर्तन सुरू केले. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, महिला खालून वर येताच तिची नजर खिडकीमधील व्हिडिओवर पडते. डीएसपी आणि महिला पळून जातात आणि व्हिडिओ बनवणारी व्यक्तीही पळून जाते.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आरोपी अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पावागडा शहरातील पीडित महिलेने पोलिसांशी संपर्क साधला आणि सांगितले की, पदाचा गैरफायदा घेत कृत्य करण्यास भाग पाडले. महिलेसोबत असलेल्या एका नातेवाईकाने या घटनेची गुप्तपणे रेकॉर्डिंग करून व्हिडिओ ऑनलाइन प्रसारित केल्याचा संशय आहे.’ दरम्यान, डीएसपीच्या मागणीला कंटाळलेल्या महिलेने तिच्या नातेवाईकासोबत हा व्हिडिओ स्वतः बनवला आहे, अशी चर्चा सुरू आहे.

पोलिस अधिकाऱ्याला वहिनीसोबत रोमान्स करताना रंगेहाथ पकडले अन्…

अधिकारी म्हणाला, तु मला खुप आवडतेस, माझ्या सोबत बंद केबिन मध्ये चल…

IPS महिला अधिकाऱ्याची फसवणूक; लग्नानंतर खरी माहिती उघड…

शिक्षकाचे 3-3 शिक्षिकांसोबत अश्लील चाळे; Video Viral…

लष्करातून निवृत्त झालेल्या वृद्धाला अश्लिल व्हिडिओ कॉल अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!