पुणे शहरातील नवले पुलावर टायरची जाळपोळ; वाहतूक अडवली…

पुणे : पुणे शहरातील मुंबई-बंगळूर मार्गावरील नवले पुलाजवळ आज (मंगळवार) आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी टायर जाळल्यामुळे बाह्यमार्गावरील बाह्यवळण मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेची माहिती मिळतात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी गाव घेतली.

मराठा आदोलकांनी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलाजवळ टायरची जाळपोळ करण्यात आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा मराठा कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहे. मुंबई आणि साताऱ्या कडे जाणारी वाहतूक आडवली आहे. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

निवृत्त पोलिसांना लेखक होण्याची सुवर्णसंधी!

महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या. पोलिस उपायुक्त सोहेल शर्मा यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या ठिकाणी आंदोलकांची समजूत काढून तब्बल दोन ते अडीच तासांनतर वाहतूक सुरु करण्यात यश मिळवले. यावेळी मराठा आरक्षण आंदोलकांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीला काही झाल्यास आंदोलन आक्रमकपणे करु असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलकांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. टायर जाळून जाळपोळ केल्याने तब्बल सहा किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.

महाराष्ट्र बंदबाबत मेसेज व्हायरल; पोलिसांकडून आवाहन…

मराठा आंदोलन! पोलिस आता अलर्ट मोडवर…

ड्रग माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात…

पुणे शहरात लहानपणापासूनच्या भांडणातून गोळीबार; एकाचा मृत्यू…

डेटींग ऍपद्वारे ग्राहकांना आकर्षीत करणारी जोडी सामाजिक सुरक्षा विभागाच्या ताब्यात…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!