निवृत्त पोलिसांना लेखक होण्याची सुवर्णसंधी!

सहभागी होण्याचे पोलिसकाका.कॉमचे आवाहन

पुणेः पोलिसदलामध्ये काम करत असताना अनेक जण जीवाची बाजी लावून धडाकेबाज कामगिरी करतात. कोणताही धागा-दोरा हाती नसताना अनेक गुन्हे उघड करून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देत असतात. पोलिसकाकांनी केलेली धडाकेबाज कामगिरी वाचकांपुढे येणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. यामुळे सेवानिवृत्त झालेल्या पोलिसकाकांनी आपण उघड केलेले महत्त्वाचे दोन-तीन गुन्हे आमच्या पर्यंत पोहचविल्यास योग्य त्या लेखांचा, कथांचा पुस्तकामध्ये समावेश केला जाईल.

पोलिसाच्या कणखर मनातही दडलेला असतो एक कवी, लेखक, गायक आणि हरहुन्नरी कलाकारही. ऊन, वारा, पाऊस, थंडी झेलत राहते ती वर्दी. अहोरात्र आपल्या मदतीसाठी तत्पर असतात ते पोलिस. पण, पोलिसांची नेहमी एकच बाजू समोर येते. अनेकदा दुसरी बाजू समोर येतही नाही. यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. पण, पोलिसांचे चांगले कार्य समाजासमोर येणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच सेवानिवृत्त झाल्यानंतर पोलिसांना लेखक म्हणून पुढे येता येणार आहे.

पोलिसांसाठी www.policekaka.com हे आम्ही हक्काचे व्यासपीठ निर्माण केले आहे. या व्यासपीठावर बातमीमागची बातमी, धडाकेबाज कामिगिरी, लेख देत आहोत. शिवाय, पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मुलाखतींवर आधारीत पुस्तक प्रकाशित करत असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पोलिसकाका पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. दुसरे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

पोलिस खात्यामधून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा तेवढीच मोठी कामगिरी पार पाडलेली असते. पोलिस दलामधून निवृत्त झाल्यानंतर अनेकांची ओळख पुसटशी होती. पण, पोलिसकाका ही वेबसाईट आणि ईश्वरी प्रकाशन संस्था पोलिसांसाठी काम करत असून, आपल्याला पुन्हा प्रकाशझोतात आणण्याचे काम करणार आहे. यामुळे आपण उघड केलेले गुन्हे सविस्तर लिहून आमच्यापर्यंत पोहचविल्यास योग्य त्या लेखांचा पुस्तकामध्ये समावेश केला जाईल.

सेवानिवृत्त पोलिस, पोलिस अधिकाऱ्यांसाठी…
– सविस्तर दोन-तीन लेख आमच्यापर्यंत पोहचवावेत.
– लेखांसोबत आपला फोटो, संपर्क क्रमांक द्यावा.
– निवडक लेखांना पुस्तकाच्या माध्यमातून प्रसिद्धी दिली जाईल.
– सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांना लेखक म्हणून प्रसिद्धी मिळेल.
– पुस्तक प्रकाशन समारंभावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला जाईल.
– आपल्या लेखांना पुस्तकाबरोबरच www.policekaka.com या वेबसाईटवर प्रसिद्धी दिली जाईल.

माहिती कोठे पाठवायची?
policekaka100@gmail.com
WhatsApp No: 90227 97223

(टीपः ज्यांना लेखनाची सवय नाही अशी पोलिसकाकांना आमच्या व्यावसायिक लेखकांची टीम शब्दांकनासाठी संपूर्ण सहाय्य करतील. संपर्क : WhatsApp 90227 97223)

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!