लॉकडाऊनमधील प्रेमसंबंधाचा तिहेरी खुनाने झाला शेवट अन्…

गुवाहाटी (आसाम) : एकाने आपली पत्नी आणि सासू-सासऱ्यांचा खून केला असून, तिहेरी हत्याकांडानंतर नजीबूर रहमान बोरा (वय २५) आणि संघमित्रा घोष (वय २४) यांच्यातील प्रेमसंबंधांचा शेवट झाला. आरोपीने नऊ महिन्यांचं बाळ हातात घेऊन पोलिसांसमोर शरणागती पत्करली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेकॅनिकल इंजिनीअर असलेला नजीबूर आणि संघमित्रा यांची लॉकडाऊनमध्ये जून 2020 मध्ये ओळख झाली होती. दोघांची फेसबुकवर मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले आणि त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये दोघे कोलकात्याला पळून गेले. संघमित्राच्या आई-वडिलांनी तिला घरी परत आणले. पण, तिने कोलकाता कोर्टात नजीबूरशी लग्न केले होते.

संघमित्राचे पालक संजीव घोष आणि जुनू घोष यांनी 2021 मध्ये तिच्यावर चोरीचा आरोप करत पोलिसात तक्रार नोंदवली. यामुळे संघमित्राला एक महिना न्यायालयीन कोठडीत जावे लागले. जामिन मिळाल्यानंतर ती तिच्या पालकांच्या घरी परतली. जानेवारी 2022 मध्ये संघमित्रा आणि नजीबूर पुन्हा पळून चेन्नईला गेले. तिथे ते पाच महिने राहिले. ऑगस्टमध्ये हे जोडपे गोलाघाटला परतले तेव्हा संघमित्रा गरोदर होती. ते नजीबूरच्या घरी राहू लागले. पुढे नोव्हेंबरमध्ये त्यांना एक मुलगा झाला.

संघमित्रा आपल्या बाळाला घेऊन पालकांच्या घरी गेली. तिने नजीबूरवर छळ केल्याचा आरोप केला आणि पोलीस तक्रार नोंदवली. खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून नजीबुरला अटक करण्यात आली. 28 दिवसांनंतर त्याची जामिनावर सुटका झाली. तुरुंगातून बाहेर आल्यावर नजीबूरला आपल्या मुलाला भेटायचे होते. पण संघमित्राच्या कुटुंबीयांनी त्याला भेटू दिले नाही. 29 एप्रिल रोजी नजीबूरच्या भावाने संघमित्रा आणि तिच्या कुटुंबीयांवर नजीबूरवर हल्ला केल्याचा आरोप करत पोलीस तक्रार नोंदवली होती.

दोन्ही कुटुंबांमधील तणाव टोकाला गेल्याने नजीबूरने पत्नी संघमित्रा आणि तिच्या पालकांची कोयत्याने हत्या केली. त्यानंतर तो आपल्या नऊ महिन्यांच्या बाळासह पळून गेला होता. नंतर त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

येरवडामधील जेल कर्मचाऱ्याची प्रेमसंबंधातून आत्महत्या; गुन्हा दाखल…

Video: पाकिस्तानात गेलेली भारतीय अंजू झाली फातिमा…

प्रियकराचा काटा काढण्यासाठी जंगलातून आणला नाग…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!