महिलेच्या प्रसुतीसाठी निघालेल्या आरोग्य सेविकेचा अपघाती मृत्यू…
कोल्हापूर : महिलेच्या प्रसुतीसाठी निघालेल्या आरोग्य सेविकेचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. स्वरूपा शिंदे असे या आरोग्य सेविकेचे नाव असून, त्यांच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आरोग्यसेविका स्वरूपा शिंदे यांना एक प्रसूतीसाठी कॉल आला होता. एका महिलेची प्रसूती करायची असल्यामुळे त्या घाईघाईने आपल्या दुचाकीवरून निघाल्या होत्या. मात्र, रस्त्यात पडलेल्या एका खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्या दुचाकीवरून खाली पडल्या आणि त्याच दरम्यान त्यांच्या डोक्यावरून समोरून येणाऱ्या एसटीचे चाक गेले. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. शाहूवाडी तालुक्यातील करंजफेनमध्ये ही घटना घडली आहे.
दरम्यान, स्वरूपा शिंदे यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात, तीन ठार…
भाविकांच्या बसला भीषण अपघात; ११ जागीच ठार; अनेकांना चिरडले…
पिंपरीमध्ये दोघांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने चिरडले अन्…
शिक्षक पती-पत्नीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; मुलगा गंभीर…
Video: रायगडमधील भीषण अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद…